पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२९) भगवद्गीता-२. त्या वरि तो हृषिकाधिप बोलतसे करुणाकर हास्यमुखें दोहिं दळी अति विव्हळ अर्जुन मारिन गोत्रज याहि सुखे ।। त्यासि बुझावित जो न पवे बहुशा करितां हयमेध-मखें तारक या भवसागरिंचा हरि वांचुनि आणिक कोण सखे ॥ १० ॥ देव म्हणे जळिं बँदबुद लोपति नेणति त्या बहु शोक जनासी कौरव हे मरती म्हणतो परि व्यर्थ चि शोक-जळी बुडतोसी ॥ शीकवं म्हणतो तुज जरि ते वदती धिर्षणोधिपते वदतोसी जाइल ते सहसा तरि जाइल पंडित शोचित नाहिं तयासी ।। ११ ।। हे नृप आणिक मी तुज देखिन आदि असो म्हण सत्य न मानी सांप्रत ही आम्हि ते चि असं परि देखसि तूं अपुल्या नयनांनी ।। या वरि हे अम्हि सर्व असे च असो निज जाणुनि घेई निदानी नाश नसे सँदै अर्यंय वस्तुस व्यर्थ चि कष्टसि शोक करूनी ॥ १२ ॥ बाळपणा सरतां तरुणा मग वृद्ध हि होय जसा निज देहो देहि नव्हे तिन्हि भेद कदाचन जीव जया म्हणती वळवा हो । तेविं जरी घडती पडती वरि फार वृद्धपण आण नव्हे हो सद्गुण जाणुनि मोह न पावति ते चि चिन्मय जो सुखलाहो । १३ ।। कां म्हणसी तरि इंद्रिय-वर्ग जयों विषयामिषे त्यास मिळे स्पर्श त्वचे प्रति उष्ण-सितादिक हे सुखदुःख जिवासकळे ॥ भोगिति भोग परी क्षणभंगुर येत अकल्पित आदळले जाणुनि सोसिं सुखें नृप अर्जुन साक्षिपणे अणि ज्ञान-बळे ॥ १४ ॥ ज्या सुखदुःख समान समानस मानित नासि न कांहिं कदापी हो विषयेद्रिय-योग-वियोग हि त्या कधि हर्ष अमर्ष न कल्पी ।। हे पुरुष + मिपावत या निज मोक्षपदावर जाइल सोपी त्या पुरुषासि म्हणे पुरुषोत्तम मी हि ह्मणो नर तो अनुतापी ।। १५ ।। नश्वर ज्यास म्हणाल तया प्रति ईश्वर भाव कदापि दिसेना शाश्वत जे सदब्रम्ह पुरातन नित्य नवे कधिं नाश असेना ॥ या उभयांसि बरे अवलोकित त्या हृदयीं कधिं शोक असेना तत्व दिसे उघडे मग हा भवसांकडिमाजि कधी गवसेना ॥ १६ ॥ ५८ हृषिकाधिप=कृष्ण. ५९ बुझावित समजावीत. ६० मेध-मख यज्ञ. ६१ बुबुद= बुडबुडा. ६२ धिषणाधिपधिषणा+अधिप-बुद्धि+स्वामी कृष्ण. ६३ स=सत्=ज्यास अस्तित्व आहे तें.६४ अव्यय-अविनाश. ६५ देही-आत्मा. ६६ अमर्ष शोक.६७ 'ष' आणि 'भि' यांचेमधील एक अक्षर कमी आहे. ६८ नश्वर-नाशवंत.