पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/४३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


शास्त्रांनी घासला आणि त्यातून ‘यंत्र' नावाचा राक्षस बाहेर पडला.त्याने अल्पावधीतच सारं जग व्यापून टाकलं. यंत्रयुगात करिअर ही संकल्पना चांगली बळकट झाली.हस्तकौशल्याची जागा यंत्राने घेतली.उत्पादन प्रचंड वाढू लागलं.यातून तेजी व मंदीया दोन नव्या प्रकारांचा परिचय लोकांना झाला.मागणी जास्त व उत्पादन कमी म्हणजे तेजी व मागणी कमी व उत्पादन जास्त म्हणजे मंदी असं सोप्या भाषेत म्हणता येइल.

 सध्याचा काळ हा महामंदीचा काळ आहे.विविध उत्पादनांनी बाजारपेठा गजबजलेल्या असल्या तरी मालाला खप नाही.त्यामुळे उत्पादन करणाऱ्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करून उत्पादन व उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यामुळे चांगलं करिअर असणारे सुधीर सारखे तंत्रज्ञ अडचणीत आले आहेत.यासंकटांवर कशी मात करता येईल ते पुढच्या लेखात पाहू.

या संकटावर मात कशी करणार / ३४