पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

If we wish to maintain democracy not merely in form, but also in fact, what must we do? The first thing is to hold fast to constitutional methods of achieving our social and economic objectives. It means we must abandon the bloody methods of nevolution, we must abandon the method of civil disobedience, non-cooperation and satyagraha. Where constitutional methods are open, there can be no justification for these unconstitutional methods. These methods are nothing but the Grammar of Anarchy and the sooner they are abandoned, the better for us. (जर आपल्याला लोकशाही केवळ बाह्य स्वरूपात नव्हे तर खरीखुरी टिकवायची असेल, तर आपण काय करणे अत्यावश्यक आहे? पहिली गोष्ट म्हणजे आपली सामाजिक व आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आपण फक्त घटनात्मक मार्गांचाच अवलंब करायला हवा. याचा अर्थ आपण रक्तरंजित क्रांतीचा मार्ग सोडूनच द्यायला हवा, आपण कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह हे मार्ग सोडूनच द्यायला हवेत. जेव्हा घटनात्मक मार्ग उपलब्ध आहेत, तेव्हा अशा घटनाबाह्य मार्गांचा अवलंब समर्थनीय नाही. असले घटनाबाह्य मार्ग म्हणजे दुसरेतिसरे काही नसून, तो केवळ अराजकाचा आराखडा ठरेल आणि जितक्या लौकर आपण असले मार्ग सोडून देऊ, तितके ते आपल्या भल्याचे ठरेल.) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६) शुक्रवार, २५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना परिषदेत बोलताना. भाग दुसरा संघर्षपूर्व