पान:अकबर काव्य.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३४ ) ते सूचनेला करि कीं नृपापुढें कांपेल भेणें' आर-सैन्य बापुडें ॥ अत्युच्छ्रित प्राज्ञ नृपाळ धीर-धी । हा सद्गुणांचा बहु थोर वारिधी ॥ फेकील की कीर्तितरंग अंबरी । देईल आनंद जनास अंतरीं ॥ वाटेकरी जंगमै टेकड्या जशा । ह्या हालती की घन - पंक्ति कृष्णश ॥ वातेरित प्रोन्नत वीर - हस्तग । शस्त्रास्त्र - कांती चपला दिले मग ॥ गजाश्व - पृष्ठावर वीर- संघते । शरीर वज्रापरि घट्ट शोभते ॥ ज्यांचे, स्व-कार्य-क्षम- देह धारण । केलें गमे वीर रसें स- कारण ॥ - घोड्यावरी स्वार लगाम खेचित । रांगेमधे चालति ते रणोचित ॥ ज्यांच्या करी खड्ग सुतीक्ष्ण शोभती । कीं त्मृयु - जिव्हाच भयाण भासती ॥ ते होउनी तन्मय वीर चालती । ज्यांच्या मनीं युद्ध - विचार घोळती ॥ ५ ६ ७ १ भयानें. २ ( अति + उछित ) उन्नतावस्थेस पोंचलेला. 3 कीर्तीच्या लाय. ४ हत्ती. ५ हलणाऱ्या. ६ काळ्या अशा. ७ वीज. ८ युद्धास योग्य.