पान:अकबर काव्य.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना, कांहीं वर्षांपूर्वी दक्षिणाप्राइज कमिटीनें अकबर बादशाहावर उत्तम काव्य करणारास बक्षीस देण्याविषयीं जाहिरात दिल्यावरून हें काव्य मीं तयार केलें, व कमिटीनें त्याजबद्दल मूला २०० रुपयांचे बक्षीस दिलें. हें काव्य यापूर्वीच प्रसिद्ध व्हावयाचें, परंतु कांहीं अपरिहार्य कारणांमुळे आजपर्यंत तें तसेंच राहिलें. मध्यंतरी हें काव्य रा० सा० शंकर मोरो रानडे बी. ए. ह्यांस मीं दाखविले. त्यांनीं तें वाचून कांहीं सूचना केल्या, तदनुरूप कोठें कोठें फेरबदल मीं आनंदानें केला आहे. रा० सा० रानडे यांनी कृपा करून मजकरितां वाचनाचे व सूचना करण्याचे श्रम घेतले याजबद्दल मी त्यांचे फार आभार मानितों. प्रस्तुत ग्रंथातील नायक जगद्विख्यात अंकबर बादशाहा आहे, त्याचा इतिहास सामान्यतः वाचकांस ठाऊक असतोच. ह्याकरितां त्याच्या संबंधानें कथाभाग संगतवार कळण्यासारख्या मजकुराचा उपक्षेप येथे करण्याची आवश्यकता दिसत नाहीं. काव्यदृष्टीनें हा ग्रंथ भाषापद्धतींत व रसांत कितपत उरला आहे हे पाहण्याचें काम ग्रंथकर्याचें नव्हे, तर सहृदय वाचकांचें आहे. तें त्यांज- कडून होण्याची उत्कट इच्छा माझ्या अंतःकरणांत उद्भवली आहे, व ती स्वाभाविकच आहे. शेवटी माझ्या ह्या अल्प कृतीपासून महाराष्ट्र भाषाभिज्ञ जनांस संतोष झाल्यास मी आपल्या श्रमांचें सार्थक्य झाले असें मानीन. पुणे, सदाशिव प्रभाकर ताटके. ता. १५/१/१९०१.