पान:अकबर.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ अकबर बादशहा. भाग सातवा. हुमायुनाची हिंदुस्थानावरील स्वारी व त्याचा मृत्यु. ॥ कीं तोडिला तरु फुटे अणखी भरानें ॥ ॥ तो क्षीण ही विधु महोन्नति घे क्रमानें ॥ शेरखानसूर यानें १५४० त हुमायुनाचा पराभव केला व मिळा- केल्या जयश्रीनें पूर्वी बाबरानें संपादिलेला प्रांत आपल्या स्वाधीन करून घेतला व त्यांत आणखी भर ही घातली. तो प्रतापी पुरुष होता खरा; परंतु, राज्यांतील निरनिराळे भाग एकत्र जुळवून त्यांस एकराष्ट्रत्व देण्यास लागणारें बुद्धिवैभव त्याच्या अंगीं त्यानें ज्याचा पराभव केला, त्या राजा - पेक्षां जास्त नव्हतें. · त्याची राज्य-पद्धति पूर्वीच्या सारखीच निरनिराळ्या प्रांतांत स्वतंत्र छावण्या देऊन कारभार चालवावयाची होती. या प्रांतांचा परस्पर संबंध ही पूर्वीच्या सारखाच अत्यल्प असे. त्यानें इ०स० १५४५ त कलिंजरास वेढा घातला व तो प्रचंड किल्ला त्याच्या हस्तगत होतो इतक्यांत त्यास जखम लागून तो मरण पावला. त्याचा दुसरा मुलगा सेलिमशाहा सूर, 'जो सुलतान इसलाम या नांवानें ही प्रसिद्ध आहे, तो बापाच्या मागून गादीवर बसला व त्यानें सात आठ वर्षे राज्य केलें. वडिलापासून परंपरेने आलेल्या राज्य पद्धतींतील दोष त्याच्या नजरेस कांहीं अंशी तरी आले असावेत. कारण, वाद- शाही अंमलाखालीं असलेल्या निरनिराळ्या प्रांतांवरील सरदारांनीं जीं नानाप्रकारचीं कृष्णकारस्थानें उपस्थित केली होतीं त्यांचा पाडाव कर- " ण्यांतच त्याच्या राजवट्याचे बहुतेक दिवस त्यास घालवावे लागले; तो मेला तेव्हां त्याचे मार्गे त्याचें एक लहानसें अर्भक गादीस वारस राहिलें, तेव्हां त्याचे सरदार पुनः बळावले. त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा झाला.