पान:अकबर.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ अकबर बादशहा. करितां निघाला. परंतु हुमायून हा निष्काळजी होता व त्यामुळे काम- रानानें निराळाच व्यूह रचून ठेविला होता त्यास पूर्ण यश आलें. त्यानें किपच्या कच्च्या खिंडीच्या वरच्या बाजूस हुमायुनावर एकदम हल्ला करून त्यास जीव घेऊन पळ काढावयास लाविलें. याप्रमाणें 'यःपलाय' करीत असतां त्यास भयंकर जखम लागली तरी तो तशाच स्थितीत नेटानें वाट काढीत काढीत सिरनपासच्या माथ्यावर कसातरी सुखरूप जाऊन पोहोंचला.' येथें त्यास फारशी भीति नव्हती. या अवकाशांत कामरान यानें काबुलावर स्वारी करून तें हस्तगत करून घेतलें, तेव्हां तिसऱ्यांदां अकबर चुलत्याच्या तावर्डीत सांपडला व त्याचा कैदी बनला. ही हानि हुमायुनानें निमूटपणे सहन केली नाहीं त्यानें आपलें सैन्य फिरून जमविलें व डोंगर ओलांडून काबुलावर स्वारी केली. तडजोड कर- ण्याच्या बोलाचालींत कांहीं दिवस व्यर्थ गेले. शेवटीं एकदम चाल करून जाण्यास हुयायुनार्ने आपल्या सैन्यास हुकूम केला; त्या लढाईत हुमायून पूर्णपर्णे विजयी झाला व कामरान पळून गेला. हुमायुनास क्षणमात्र अशी मोठी भीति वाटली कीं न जाणो कामरान पळून जातांना आपल्या मुलास बरोबर घेऊन गेला असेल. परंतु, शहरांत प्रवेश करता येण्या- पूर्वीच पालक हासन आखता यासह अकबर बापाचे शिबिरांत येऊन पोहोंचला व हुमायून चितासागरांतून मुक्त झाला. दुसरे दिवशीं त्यानें शहरांत प्रवेश केला. यावेळचा विजय निर्णायक व कायमचा असा होता. इनामांची वांटणी करीत असतां हुमायुनानें आपले मुलास वगळिलें नाहीं. चिरख नांवाचा प्रांत त्यांने अकबरास जाहगीर दिला, व सिस्थानाचा हाजी महमदखान यास त्याचा अमात्य नेमून त्याजकडेसच त्याचें शिक्षण सोपविलें. पुढील साली त्याच्या विपत्तीची कारणे एका मागून एक नष्ट झाली. कामरानानें आणखी एकदां बंडावा केला खरा; परंतु त्याचा पिच्छा इतक्या निकराने पुरविला कीं त्यास दाती तृण धरावें लागले.