पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ अंतरिक्षांतील चमत्कार. जर आपण आपल्या पृथ्वीगोलाचे एका टोंकापासून निघालों, आणि मध्यंतरी एक पळभरहि न थांबतां रात्रंदिवस प्रवास केला, तर पृथ्वीप्रदक्षिणा पुरी करून परत त्या टोंकास येण्यास एक पंधवडा बस्स होईल. परंतु, या मानानें सूर्य- गोलाची एक प्रदक्षिणा करण्यास पूर्ण पांच वर्षे लागतील! इतका मोठा सूर्याचा परिघ आहे. आपली पृथ्वी आपणांस येवढी मोठी वाटते. पण, अशा बारा लक्ष ऐशीं हजार पृथ्व्या एकत्र कराव्या, तेव्हां सूर्याएवढा एक गोळा होईल ! ६ व्या आकृतींत एक मोठें वर्तुळ व एक लहान वर्तुळ अशीं दोन वर्तुळें दाखविली आहेत. या दोन वर्तुळांवरून सूर्य आणि पृथ्वी यांचें परस्पर आकारमान समजून येईल. मोठ्या वर्तुळा- एवढा सूर्य आहे अशी जर कल्पना केली, तर पृथ्वीचा आकार लहान वर्तुळाएवढा येईल. सूर्य जरी इतका मोठा आहे, तरी तो आपणांस नुसत्या डोळ्यांनी लहानशा ताटलीएवढा दिसतो. कां कीं, तो आपणां- पासून फार दूर आहे. सूर्यापासून पृथ्वीचें मध्यम अंतर ९ कोटि २७ लक्ष मैल आहे; ह्मणजे सूर्य आपणांपासून ९ कोटि २७ लक्ष मैल दूर आहे असें झालें. ९ कोटि २७ लक्ष मैल हें केवढें भयंकर अंतर ! नुसत्या आंकड्यांवरून इतक्या मोठ्या अंतराची खरी कल्पना मनांत येत नाहीं. ९ कोटि २७ लक्ष हे आंकडे एकसारखे मोजण्याचा प्रयत्न करावा, ह्मणजे सूर्य आपणांपासून किती दूर आहे, याची