पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४. सूर्य. ज्या एका कुटुंबांत कोट्यावधि व्यक्ति आहेत, अशा सूर्यमालेसारख्या प्रचंड कुटुंबाचा स्वामी जितक्या योग्यतेचा आणि जेवढ्या महत्वाचा असावयास पाहिजे, तितक्या योग्य- तेचा आणि तेवढ्या महत्वाचा आपला सूर्य आहे, हें या भागांत केलेल्या वर्णनावरून वाचकांस सहज कळून येईल. सूर्य हा आकारानें अतिशयित मोठा आहे. सूर्यमालेतील ग्रह, उपग्रह, आणि दुसरे सर्व पदार्थ, हीं सर्व जरी एके ठिकाणीं केली, तरी त्यांच्याच्यानें सूर्याची बरोबरी होणार नाहीं. सूर्याचा व्यास ८६५००० मैल आहे. सूर्यगोलाचा परिघ २६९०००० मैलांपेक्षां अधिक होईल. मैलांची नुसती संख्या समजल्यानें सूर्याचा किती विस्तीर्ण परिघ आहे याची कल्पना मनांत बरोबर उतरत नाहीं. ह्मणून, हे दुसऱ्या रीतीनें स्पष्ट करून दाखवूं. दर तासास ६० मैल जाणाऱ्या आगगाडीनें