पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२. अंतरिक्षांतील चमत्कार. फिरून येतात. १८/१९ वर्षांतील ग्रहणें पाहून, पुढील पुष्कळ वर्षांतील ग्रहणें अगोदर सांगतां येतात. एक ग्रहण झाल्यावर ६५८५ दिवसांनीं बहुतेक तसेंच ग्रहण पुनः होतें. सन १८८१ चे दिसेंबरचे पांचवे तारखेस एक चंद्रग्रहण झालें होतें. या तारखेचे ६५८५ दिवस पूर्वी ह्मणजे १८ वर्षे ११ दिवस पूर्वी १८६३ ची नोवेंबरची २४ वी तारीख होती. आणि त्या तारखेस तसेंच चंद्रग्रहण लागले होतें ! सन १८८१ सालीं चार ग्रहणें होतीं. आतां जर १८८१ सालांतील ग्रहणांच्या तारखा घेऊन पुढे ६५८५ दिवस मोजिले, तर १८९९ च्या त्या त्या तारखेस तशींच ग्रहणें लागतील ! पुष्कळ वर्षांचीं ग्रहणें पाहून, ही खुबी प्राचीन काळचे ज्योतिष्यांस समजली होती. यास्तव, जरी त्यांस चंद्र- कक्षेचें हल्लींच्या इतकें सूक्ष्म ज्ञान नव्हतें, तरी ते ग्रहणांचा काळ अगदी बरोबर सांगत असत. एरव्ही नुसत्या डोळ्यांनीं सुद्धां चंद्राचा पृष्ठभाग अगदीं गुळगुळीत नसावा असे वाटतें. दुर्बिणींतून चंद्राकडे पाहिलें असतां, तेथें मोठमोठे डोंगर व दऱ्या आहेत असे दिसून येतें. पौर्णिमेचा चंद्र व सप्तमीचा चंद्र दुर्बिणींतून कसा दिस तो, हें १९व्या व २० व्या आकृतींवरून स्पष्ट दिसून येईल. चंद्रावरील चमत्कारिक देखाव्यांचें स्वरूप या आकृतींवरून बरेचसें लक्षांत येतें. या आकृतींत जे काळे भाग दिसत आहेत व जे एरव्हीं देखील नुसत्या डोळ्यांनी चंद्रावर दिस-