पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चंद्र. १०१ पृथ्वी मध्ये असल्यामुळें सूर्याचा प्रकाश त्याच्यावर जात नाहीं. या वेळीं चंद्रग्रहण होतें. सूर्यग्रहणाप्रमाणें हें ग्रहणहि अंशग्रहण किंवा खग्रास असतें. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्यें चंद्र येण्याचा संभव फक्त अमावास्येसच असतो, आणि सूर्य व चंद्र यांच्यामध्यें पृथ्वी येण्याचा संभव फक्त पौर्णिमेसच असतो. त्यामुळे सूर्यग्रहण झालें तर अमावास्येस होतें, व चंद्रग्रहण झालें तर पौर्णिमेस होतें. आतां, दर अमावास्येस सूर्यग्रहण आणि दर पौर्णिमेस चंद्रग्रहण व्हावें असें वाटतें; परंतु तसे होत नाहीं. कारण, चंद्र ज्या मार्गानें फिरतो, त्या मार्गाची ह्मणजे चंद्राच्या कक्षेची पातळी, आणि पृथ्वी ज्या कक्षेत फिरते त्या कक्षेची पातळी, ह्या दोन्ही पातळ्या एका सपाटींत नाहींत; त्या एकमेकीशीं जरा कललेल्या आहेत. त्यामुळे, अमावास्येच्या व पौर्णिमेच्या दिवशीं चंद्र पृथ्वीचे कक्षेच्या पातळीचे किंचित् वर किंवा खालीं असतो, आणि ह्मणूनच दर अमावास्येस किंवा पौर्णिमेस ग्रहण होत नसतें. ज्या अमावास्येस किंवा पौर्णिमेस चंद्र व पृथ्वी बरोबर एका पातळीत येतील, त्यावेळी मात्र ग्रहण होऊं शकतें. ग्रहणा- संबंधीं एक विशेष लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट आहे. ती अशी:- कांहीं वर्षांनीं तींच तींच ग्रहणें पुनः पुनः होतात. यंदाचीं ग्रहणें मागील किंवा पुढील सालच्या ग्रहणांप्रमाणे नसतात हें खरें. परंतु, पुष्कळ वर्षांतील ग्रहणांविषयीं विचार केला, तर असें दिसून येतें कीं, बहुतेक तशींच ग्रहणें फिरून