पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०० अंतरिक्षांतील चमत्कार. पूर्ण चंद्र दिसतो व त्यास आपण पौर्णिमेचा चंद्र असें ह्मणतों. निमी बाजू वळलेली असेल, तर ते वेळेस अष्टमी झाली असें आपण समजतों. आणि जर चंद्राची प्रकाशित बाजू आपणांकडे मुळींच वळलेली नसेल, तर ते दिवशीं चंद्र मुळींच दिसणार नाहीं, व या दिवसास आपण अमावास्या ह्मणतों. याप्रमाणें चंद्रास कला होतात. १६ व्या आकृतींत या कला दाखविल्या आहेत. चंद्र हा स्वतः निस्तेज पदार्थ असल्यामुळे, तो पृथ्वीभों- वर्ती भ्रमण करीत असतांना जेव्हां सूर्य व पृथ्वी यांच्यामध्यें येतो, तेव्हां सूर्य अदृश्य होतो, आणि पृथ्वीवर अंधार पडतो. यास सूर्यग्रहण ह्मणतात. जर सूर्याचा कांहीं भाग अदृश्य झाला, तर त्यास सूर्याचें अंशग्रहण ह्मणजे अपूर्णग्रहण ह्मण- तात; आणि जर संपूर्ण सूर्य अदृश्य झाला, तर त्यास सूर्याचें खग्रास ग्रहण ह्मणतात. कधीं कधीं ग्रहणसमयीं चंद्राच्या योगानें सूर्यविंबाचा मधला भाग झांकला जाऊन सूर्याचा भोंव- तालचा भाग चकचकीत कड्याप्रमाणें दिसतो. यास 'कंकण- ग्रहण' ह्मणतात. (आकृति १७वी पहा). सूर्य व पृथ्वी यांच्या- मध्ये चंद्र आला ह्मणजे सूर्यग्रहण होतें; आणि सूर्य व चंद्र यांच्यामध्यें पृथ्वी आली ह्मणजे चंद्रग्रहण होतें. ( आ० १८ वी पहा). कारण कीं, पृथ्वीहि चंद्राप्रमाणें निस्तेज आहे, आणि तिची सावली अंतरिक्षांत पुष्कळ मैलपर्यंत पडते. चंद्र पृथ्वी- भोंवतीं फिरत असतां जेव्हां पृथ्वीच्या सावलीत येतो, तेव्हां