पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चंद्र. दिवस लागतात. परंतु इतक्या काळांत पृथ्वी आपल्या कक्षेत पुढे गेली असतेच. तितका मार्ग क्रमण्यास चंद्रास आणखी दोन दिवस लागतात. यामुळे पृथ्वीभोंवतीं चंद्राचा एक फेरा होण्यास सुमारें २९३ दिवस लागतात. चंद्रास आपले आंसावर फिरण्यासहि इतकेच दिवस ह्मणजे २९३ दिवस लागतात. त्यामुळे, चंद्राची एकच बाजू पृथ्वीकडे नेहमीं फिर- लेली असते, आणि तेवढीच आपणांस दिसते. चंद्राची दुसरी बाजू आपणांस कधींहि दिसत नाहीं, व दिसणारहि नाहीं. २९३ दिवसांत चंद्र आपले आंसावर फिरतो. यास्तव चंद्रा- वरील दिवस आपले एका पंध्रवड्याएवढा असतो; आणि रा- त्रहि तेवढीच असते !

चंद्रास स्वतःचा प्रकाश नसल्यामुळे, सूर्याच्या प्रकाशानें प्रकाशित चंद्राच्या बाजूपैकीं जितका भाग पृथ्वीकडे वळ- लेला असेल, तितकाच चंद्राचा भाग आपणांस दिसतो. जर प्रकाशित सर्व बाजू पृथ्वीकडे वळलेली असेल, तर आपणांस

  • एका वाटोळ्या टेबलाभोंवतीं त्या टेबलाकडे तोंड करून आपण एक

प्रदक्षिणा घालावी. ह्मणज असे स्पष्ट दिसून येईल कीं, टेबलाकडे तोंड करून एक आपली प्रदक्षिणा त्याभोंवतीं पुरी झाली ह्मणजे आपल्या स्वतः- भोंवतीं आपली प्रदक्षिणा सहजच तितक्या वेळांत पुरी होते. याचप्रमाणें पृथ्वीभोंवतीं चंद्राचा एक फेरा २९३ दिवसांत पुरा होतो व तितक्याच वेळांत चंद्र आपल्या स्वत:भोंवतीं- आपले आंसावर-एक वेळ फिरतो, ह्मणजे चंद्राची एकच बाजू पृथ्वीकडे वळलेली असते, आणि त्यामुळे चंद्राची दुसरी बाजू आपणां पृथ्वीवरील लोकांस कधींहि दिसत नाहीं.