पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५० अंतरिक्षांतील चमत्कार. सूर्याकडे नियमित वर्षांनी परत येतात, त्यांपैकीं कांहीं शेंडे- नक्षत्रें सूर्यापासून दूर जात जात सुमारें १० अब्ज मैलप- र्यंत अंतरिक्षांत दूर जात असतात, आणि तेथून तीं सूर्याचे आकर्षणानें ओढलीं जाऊन सूर्याकडे फिरून परत येत अस तात. यावरून १० अब्ज मैलपर्यंत लांब सूर्याचा अंमल चालतो, आणि सूर्यमालेचा जो मध्य सूर्य, त्या मध्यापासून चोहोंकडे सर्व दिशांस कमीत कमी १० अब्ज मैलपर्यंत तरी त्या मालेचा विस्तार असावा असे वाटतें ! याप्रमाणें आपली ही सुंदर सूर्यमाला आहे. ही प्रचंड माला अंतरिक्षांत अगदीं अधांत्रीं अलग अशी राहिलेली आहे. या मालेचा दुसऱ्या कोणत्याहि तान्याशी संबंध नाहीं, असें धरून चाललें असतां चालेल; ह्मणजे, अंतरालांत सूर्य- माला ही अगदीं स्वतंत्र व्यवस्था आहे असे दिसतें. या अनंत अंतरिक्षसमुद्रांत सूर्यमाला एक स्वतंत्र बेटच आहे असें सटलें असतां चालेल. आणि, या मालेपासून अगदी जवळचा जरी तारा घेतला, तरी त्याचें अंतर इतकें मोठें आहे कीं, त्याविषयीं विचार करितांना बुद्धि थक्क होऊन जाते ! आका- शांत केवळ बिंदुवत् चमकणारे तारे आपल्या सूर्याप्रमाणें देदीप्यमान सूर्य आहेत असे सिद्ध झाले आहे. तेव्हां, त्यांनाहि आपल्या ग्रहमालेप्रमाणें- किंबहुना यापेक्षांहि मोठ्या -ग्रहमाला असतील. परंतु याविषयीं आपणांस प्रत्यक्ष असें कांहींच माहीत नाहीं. त्या ग्रहमाला कितीहि मोठ्या