पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यमाला. पाहूं. सूर्यापासून बुधाचें मध्यमं अंतर सुमारें ३ कोटि ६० लक्ष मैल, शुक्राचें ६ कोटि ७० लक्ष मैल, पृथ्वीचें ९ कोटि २७ लक्ष मैल, मंगळाचें १४ कोटि १० लक्ष मैल, गुरूचें ४८ कोटि २० लक्ष मैल, शनीचें ८८ कोटि ४० लक्ष मैल, युरेनसाचें १ अन्ज ७६ कोटि मैल, आणि नेप्च्यूनचें २ अब्ज ७९ कोटि मैल. याप्रमाणें सूर्यापासून ग्रहांचीं निरनि- राळी अंतरे आहेत. (आकृति ५ वी पहा.) हे ग्रह आप आपल्या कक्षेत राहून सूर्याभोंवतीं प्रदक्षिणा घालीत असतात. याचे कारण सूर्याची आकर्षणशक्ति होय. सर्वोत अत्यंत शेवटला ग्रह नेप्च्यून आहे. हा ग्रह सूर्यापासून २ अब्ज ७९ कोटि मैल दूर आहे. तेव्हां, सुमारें ३ कोटि मैलपर्यंत सूर्याचे आकर्षणशक्तीचा प्रभाव चालतो, आणि तेथपर्यंत सूर्यावरची उष्णता व उज़ेड हीं जाऊन पोंचतात असें ह्मणण्यास कांहीं हरकत नाही. शिवाय, गणित करून ज्योति- प्यांनीं असें काढिले आहे कीं, जीं कित्येक शेंडेनक्षत्रें १ सूर्याभोवती फिरण्याचे ग्रहांचे मार्ग दीर्घवर्तुलाकार- बदामी आका- राचे असल्यामुळे ग्रह सूर्याच्या कधी फार जवळ असतात, व कधीं फार दूर असतात. याप्रमाणे, जेव्हां बुध हा ग्रह सूर्याच्या फार जवळ येतो, तेव्हां सूर्यापासून याचें अंतर २ कोटि ८५ लक्ष मैल असते; आणि जेव्हां हा ग्रह सूर्यापासून फार दूर जातो, तेव्हां याचें अंतर ४ कोटि ३५ लक्ष मैल असतें. या दोन अंतरांची बेरीज करून निम्मे केली असतां जें अंतर निघतें, त्यास 'मध्यम अंतर' असें ह्मणतात. २ ४