पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. अंतरिक्षांत एकहि आढळून येत नाहीं. शुक्र जेव्हां अत्यंत तेजस्वी दिसतो, तेव्हां त्याचें तेज असंख्य ताज्यांत जे अत्यंत तेजस्वी तारे समजले जातात, त्यांच्यापेक्षांहि ५०/६० पट अधिक असतें ! शुक्राचें तेज इतकें मोठें आहे कीं, कधीं कधीं त्याचें चांदणेंहि पडतें, ही गोष्ट सर्वांस माहीत आहे. भर दुपारीं सुद्धां हा ग्रह निरभ्र आकाशांत न्याहाळून पाहिला असतां नुसत्या डोळ्यांनीं देखील कधीं कधीं दृष्टीस पडतो. ७८ शुक्र इतका तेजस्वी दिसत असतां, यास स्वतःचा प्रकाश मुळींच नाहीं, एखाद्या दगडाच्या गोलाप्रमाणें हा एक प्रका- शरहित अंतरिक्षांतील जड पदार्थ आहे, हें वाचून वाचकांस प्रथम आश्चर्य वाटेल, आणि आम्ही येथें कांहीं तरी सांगत आहों असा त्यांचा समज होईल. परंतु, शुक्रास स्वतःचा प्रकाश नसतां तो तेजस्वी कां दिसतो ही गोष्ट वाचकांच्या मनांत पूर्णपणे येण्याकरितां आकृति ११ येथें पृथ्वी, शुक्र आणि सूर्य हीं दाख- विलीं आहेत. या आकृतींत सूर्याच्या मानानें पृथ्वी ही जितकी लहान दाखवावयास पाहिजे होती, तितकी लहान दाखवितां येत नसल्यामुळे तशी दाखविली नाहीं हें येथें सांगणे जरूर आहे. या आकृतींत पृथ्वीवरून एक मनुष्य दुर्बिणींतून पाहत आहे, सूर्य अस्त पावला आहे-ह्मणजे तो क्षितिजाखाली गेला आहे आणि त्यामुळें सूर्याचे किरण पाहणाराकडे येऊं शकत नाहींत, रात्र झाली आहे, सूर्याचे किरण शुक्रावर पडल्यानें तो चमकूं लागला आहे, ही स्थिति दाखविली आहे.