पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३८ अंतरिक्षांतील चमत्कार. ह्रीं सर्व निर्माण व्हावयाचीं. आज आपण जे तारे, जे तारा- पुंज, व जी आकाशगंगा पहातों, तीं सर्व धूमपुंजांचे उदरां- तून निघालीं आहेत. आपला सूर्य आणि त्याची ही प्रचंड माला यांचीहि उत्पत्ति धूमपुंजापासून झाली आहे. तेव्हां आपल्या जीविताचा उगम परंपरेनें धूमपुंजांपर्यंत जाऊन पोंचतो. आपल्या ज्ञानाचीहि मर्यादा धूमपुंजांपर्यंत जाऊन पोंचते. हे धूमपुंज केव्हां व कसे झाले हें समजणें मनुष्य- ज्ञानाच्या बाहेर आहे. सारांश, अंतरिक्षचमत्कारांचें मूळ- बीज धूमपुंज या जड पदार्थांत आहे असें आजचें ज्ञान आपणांस सांगतें. पुढे आणखी काय काय शोध लाग- तील आणि मनुष्याच्या ज्ञानाची मर्यादा कोठपर्यंत वाढेल याची कल्पना करितां येत नाहीं. कारण कालाच्या अनंत व अद्भुत उदरांत काय आहे आणि काय नाहीं हें कोण सांगूं शकेल?