पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धूमपुंज. २३७ पुंजाची आहे. हा धूमपुंज कर्कासारखा ह्मणजे खेकड्यासार- खा दिसतो ह्मणून ह्यास कर्कधूमपुंज (Crab Nebula ) ह्मणतात. ...: याप्रमाणें धूमपुंज ह्मणून जे अद्भुत अंतरिक्षस्थ जड पदार्थ आहेत त्यांचें वर्णन केलें. हे पदार्थ विश्वाचे अगदी शेवटचे कांठावर टांगलेले आहेतसे वाटतात. यांच्या पलीकडे आकाशाची पोकळी दिसत असतेच ! तिला सीमा ह्मणून नाहींच ! धूम- पुंजांपर्यंत येऊन पोंचलों ह्मणजे मानवी ज्ञानाची मर्यादा झाली. यांच्या पलीकडे विश्वविवरांत डोकावण्याची आपणांस कितीहि उत्कट इच्छा असली, तरी मानवी बुद्धीची गति चालत नाहीं, आणि कल्पनाशक्ति देखील हात टेंकते. तेव्हां या ठिकाणीं मानवी ज्ञानाची गति कुंठित झाली; निदान या शतकांतील मनुष्यांच्या ज्ञानाची हीच मर्यादा होऊन चुकली आहे असें ह्मणावें लागतें. पलीकडील विश्व जरी आपणांस दिसत नाहीं किंवा कळूनहि येत नाहीं, तरी तें अनंत आहे आणि तें अद्भुत चमत्कारांनी अनंतपट भरलें आहे अशी प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या अनुभवा- वरून कोणाचीहि सहज खात्री होणार आहे. अंतरिक्षांतील निरनिराळ्या प्रकारचे जड पदार्थ अवलो- कन करून आणि त्यांविषयीं सूक्ष्म विचार करून विद्वान लोकांनीं असा सिद्धान्त केला आहे कीं, एकएक धूमपुंज मटला ह्मणजे तें एक स्वतंत्र विश्वच होय; व यापासूनच तारे, जोडतारे, तारापुंज, तारागुच्छ आणि त्यांच्या स्वतंत्र माला