पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. धूमपुंज आहे. हा दुर्बिणींतून कसा दिसतो हें ४८ व्या आकृतींत दाखविलें आहे. हा धूमपुंज एक विलक्षण मोठें कंकणच होय. हें कंकण किती मोठे आहे याची कल्पना- हि करितां येणार नाहीं. या कंकणाकृति धूमपुंजाच्या एका टोंकापासून जर आगगाडी दर तासांत ६० मैल जाण्याच्या वेगानें निघाली, आणि ती तशीच मध्यें क्षणभरहि न थांबतां एकसारखी चालली तर त्या टोंकाजवळ फिरून येण्यास तिला कित्येक सहस्रावधि वर्षे लागतील ! किती सहस्र वर्षे लागतील हे सांगण्याचें धाडस कोणाच्यानेंहि होणार नाहीं. इतकें मात्र उघड आहे कीं, हा प्रवास संपण्यास कित्येक युगांइतका तरी काळ लोटला पाहिजे ! मळसूत्राप्रमाणे किंवा नागमोडीसारखे दिसणारे कांहीं धूम- पुंज आहेत. यांपैकी एक प्रसिद्ध धूमपुंज सप्तऋषिपुंजाजवळ श्यामशबलपुंजांत आहे. याचा आकार ४९ व्या आकृतीप्रमाणे दिसतो. ह्या धूमपुंजाची स्पष्ट आकृति दिसण्यास फार मोठी दुर्बीण लागते. साधारण दुर्बिणींतून दोन धूमपुंज एकमेकांस लागलेले आहेत असा देखावा दिसतो. ध्रुवणनक्षत्राच्या उत्तरेस आकाशगंगेच्या जंबूकनामक तारापुंजभागांत एक मोठा विलक्षण धूमपुंज पहाण्यास सांप- डतो. याचा आकार डमरूप्रमाणें दिसतो. (आकृति ५० वी पहा. ) ११ वी आकृति ही वृषभराशींतल्या एका प्रसिद्ध धूम-