पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धूमपुंज. एरवीं नुसत्या डोळ्यांनीं दिसत नाहीं. पण दुर्बिणींतून पाहिले असतां याची सुंदर विलक्षण आकृति तेव्हांच नज- रेस पडते. याची आकृति कापसाच्या तुकड्यासारखी वांकडी तिकडी पसरली आहे. (आकृति ४५ वी पहा). जो जों मोठ्या दुर्बिणींतून या धूमपुंजाकडे पहावें तो तो याचा विस्तार अधिकाधिक पसरला आहे असे अनुभवास येतें. तेव्हां हा किती मोठा असावा आणि यानें विश्वाची जागा किती व्यापिली असावी हें कांहींच सांगतां येत नाहीं. हा पुसट निळसर रंगाचा दिसतो. यांतील कांहीं भाग फारच तेजस्वी आहेत. मधला भाग तर अत्यंत तेजःपुंज दिसतो. देवयानीच्या तारापुंजांत एक सुंदर धूमपुंज आहे. काळो- ख्या रात्रीं पाहिले असतां नुसत्या डोळ्यांनीं देखील हा ओळखतां येतो. एखाद्या अंधुक पुसट ठिपक्याप्रमाणे याचा आकार दिसतो. दुर्बिणींतून याकडे पाहिले असतां जवळपास हजारों तारे आहेत आणि मध्यभागी प्रकाशाचा लोळच्या लोळ अंडाकृति लांबट पसरला आहे असे दिसतें. दुर्बिणींतून या धूमपुंजाचें स्वरूप कसें दिसतें तें ४६ व्या आकृतींत दा- खविलें आहे. या धूमपुंजाशी तुलना करितां आपली एवढी प्रचंड सूर्यमालाहि किती क्षुद्र दिसते हें ४७ व्या आकृती- वरून सहज ध्यानांत येईल. या जातींच्या जड पदार्थांत कंकणाकृति धूमपुंज पाहण्या- ची फारच मौज आहे. तूळराशींत असा एक कंकणाकृति