पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३४ अंतरिक्षांतील चमत्कार. आहे हेंहि आपण पाहिलें. तेव्हां आपल्या सूर्यासारखे शेंकडों किंबहुना हजारों सूर्य आणि त्यांच्या प्रचंड माला ज्यामध्यें तयार होत आहेत, ते धूमपुंज केवढे अवाढव्य असले पाहि- जेत बरें? धूमपुंज हे विश्वमातेचें उदर आणि या उदरांतून लक्षावधि ताऱ्यांची उत्पत्ति ही गोष्ट मनांत आणली असतां या अद्भुत जड पदार्थांचें महत्व कांहींसें तरी समजल्यावां- चून राहणार नाहीं. हे जड पदार्थ आपणांपासून किती दूर आहेत याचीहि कल्पना करवत नाहीं. अगोदर ताऱ्यांचींच अंतरें स- मजण्याची कोण मारामार? मग जे पदार्थ ताऱ्यांपेक्षांहि अनेकपट दूर आहेत त्या धूमपुंजांचीं अंतरें कशीं का- ढितां येतील ? एवढी गोष्ट मात्र खरी कीं हे पदार्थ विश्व- विवरांत फारच दूर अंतरावर आहेत. ते इतके कीं, प्रका- शाची गति जरी एका मिनिटांत १ कोटि २० लक्ष मैल जाण्याइतकी आहे, तरी या पदार्थांवरील प्रकाश पृथ्वीवर येऊन पोंचण्यास लक्षावधि वर्षे लागत असतील. तेव्हां जी गोष्ट मानवी बुद्धीसच नव्हे तर मानवी कल्पनेसहि अगम्य, त्या गोष्टीचें वर्णन तरी कसे करावें ? आतां, कांहीं प्रसिद्ध धूमपुंजांविषयीं थोडीशी हकीकत देऊन हा भाग संपवूं. मृगनक्षत्रांचे पुंजांत एक धूमपुंज आहे असे मागें सांगण्यांत आले आहे तें वाचकांस स्मरत असेलच. हा धूमपुंज पहाणें अत्यंत चित्तवेधक आहे. हा