पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धूमपुंज. तारापुंजांच्या प्रकाशाचें पृथक्करण एका तऱ्हेचें असतें, आणि ज्यांस हह्रीं धूमपुंज असें समजतात त्या जड पदार्थांच्या प्रकाशाचें पृथक्करण कांहीं निराळ्याच तऱ्हेचें होतें. यावरून, तान्यांचे पुंज आणि धूमपुंज हे अगदीं निरनिराळ्या जातीचे जड पदार्थ आहेत असें आतां पूर्ण निश्चित झाले आहे. सह- स्रावधि ताऱ्यांचा समुदाय मिळून तान्यांचे गुच्छ किंवा पुंज झालेले असतात; आणि ज्यांत केवळ जळत असलेल्या वायूंचा धुराप्रमाणे पांढुरका लोट मात्र दिसतो ते खरोखर धूमपुंज होत. हे धूमपुंज निरनिराळ्या आकृतींचे आहेत असे समजून आलें आहे. कित्येक अगदीं वाटोळे दिसतात, तर कित्येक वांकडे तिकडे सर्व बाजूंस पसरले आहेत असें नजरेस येतें. कांहीं कंक- णाकृति आहेत, तर कांहीं लांबच लांब पट्टयांप्रमाणे आहेत. कांहींचा आकार डमरूप्रमाणे असतो, आणि कांहींचा आकार मळसूत्राप्रमाणे किंवा नागमोडीप्रमाणें दिसतो. (आकृति ४४ पासून ५१ पर्यंत पहा.) आतां धूमपुंजांचे आकार केवढे मोठे आहेत हे समजतें का पाहूं. वस्तुतः पाहिले तर या अद्भुत जड पदार्थांचे आकार किती मोठे असावेत हे सांगतां येत नाहीं. फार काय, याची कल्पनाहि करितां येत नाहीं. आपल्या प्रचंड सूर्याचेंच प्रकरण केवढें जबरदस्त हें पूर्वी सांगितले आहेच. ज्या मालेचा विस्तार निदान १० अब्ज मैलपर्यंत तरी चोहों- कडे पसरला आहे अशी आपली सूर्यमाला केवढी प्रचंड