पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. आमची सूचना आहे. सप्तऋषींच्या ताऱ्यांचा पुंजका बहुतक- रून सर्वांस माहीत आहेच. ( आकृति ३८ वी पहा). या सप्त- ऋषींच्या सात ताज्यांपैकी पुढल्या चार तान्यांचा कांहींसा चौ- कोन झालेला दृष्टीस पडतो. एखाद्या चांगल्या काळोख्या रात्रीं आकाशांत या चौकोनाकडे एरव्हीं नुसत्या डोळ्यांनी पाहिलें असतां त्यांत दहा बारा तारे आहेत असे आढळून येतें. पण तेंच ऑपराग्लासांतून पाहिले तर त्या ठिकाणीं सुमारें २०० तारे आहेत असें दृष्टीस पडतें. यावरून, साधारण या चिमुकल्या यंत्रानें देखील एरव्हींपेक्षां वीसपट अधिक तारे आपल्या नजरेस पडतात ! तेव्हां, जर नुसत्या डोळ्यांनी सर्व आकाशांत सहा हजार तारे दिसतात, तर ऑपराग्लासाच्या साह्यानें १लक्ष २० हजार तारे आपणांस पाहण्यास सांपडतील हे उघड आहे. आतां जिचें वरचें भिंग फक्त ३ इंच व्यासाचें आहे, अशी आपण एक लहानशी दुर्बीण घेतली, आणि तींतून तारे पाहण्यास लागलों तर सर्व आकाशभर ६ लक्ष ४० हजार पर्यंत तारे आढळून येतील! नुसत्या डोळ्यांनी जितके तारे दिसतील, त्यांपेक्षां सुमारें १०० पट अधिक तारे या लहानशा दुर्बिणींतून दिसतात. इतक्यांतच ताऱ्यांची संख्या संपली नाहीं ! आतांसा कोठें तारे मोजण्यास आरंभ झाला आहे ! लहान दुर्बिणींतून दिसत नाहींत असे लक्षावधि तारे मोठ्या दुर्बिणींतून स्पष्टपणें दृष्टीस पडतात. मोठ्या दुर्बिणींतून १ कोटि- पर्यंत तारे दिसतात असें ह्मणतात. तेव्हां एरव्हीं नुसत्या