पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तारे किती आहेत. आपणांस मोठ्या शक्तीच्या दुर्बिणींतून दिसूं शकेल, तितकेंच काय तें आपण पहातों. आपण पहातों तो भाग जरी एकंदर विश्वाचा अत्यंत अल्प अंश होय, तरी या लहानशा भागांतच आपणांस थक्क करून टाकण्यासारख्या किती विलक्षण गोष्टी आहेत हें पुढील विवेचनावरून वाचकांस पूर्णपणे कळून येईल ! तारे किती आहेत ? तारे मोजण्याचें काम जर कोणीं पतकरिलें, तर तें त्याच्या हातून कधीहि व्हावयाचें नाहीं. कांकीं, ही गोष्ट मानवी शक्ती- च्या बाहेर आहे ! दुर्बिणीशिवाय देखील आपणांस हजारों तारे आकाशांत दृष्टीस पडतात. नुसत्या डोळ्यांनीं सुमारें सहा हजार तारे दिसतात. परंतु एखादी लहानशी दुर्बीण घेऊन पाहिले तर ताऱ्यांचा समुदाय पुष्कळच मोठा आहे असें आढळून येतें. नाटक पहातांना ज्या एका दुर्बिणीसारख्या लहानशा यंत्राचा उपयोग करितात, त्या ऑपराग्लासांतून देखील पुष्कळ तारे नजरेस येतात. हें ऐकून पुष्कळांस आश्चर्य वाटेल यांत संशय नाहीं. आमच्या एका सुशिक्षित मित्रास देखील ए- कदां असेंच वाटलें होतें. परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर त्याचा संशय अर्थात् एकदम दूर झाला. यास्तव आमच्या कोणास शंका येईल, त्यानें प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहावा अशी कीं ज्या