पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. डील प्रदेशांत उत्तर अरुणोदयाचे जे चमत्कार घडतात, यांचा कांहीं तरी परस्पर संबंध असावा, असेंहि कळून आलें आहे. परंतु, हा संबंध काय असावा, हे मात्र अद्याप गूढ आहे. ज्या वर्षी सूर्यावर पुष्कळ डाग दृष्टीस पडतात, त्या वर्षी पृथ्वीवर लोहचुंबकशक्तींत अतिशयित गडबड उडून जाते, हे पाहण्यांत आले आहे. आणि, लोहचुंबकशक्ती- मुळे जे चमत्कार घडतात त्यांचा आणि ध्रुवांकडे प्रकाशाचे मोठमोठे पुंज कांहीं दिवस दृष्टीस पडतात त्या पुंजांचे चम- त्कारांचा परस्पर संबंध आहे याविषयीं आतां शंका उरली नाहीं. तेव्हां, सूर्याचे डागांचा आणि उत्तर अरुणोदयाचे चमत्कारांचाहि संबंध असावा असे दिसून येतें. इ० स० १८१९ सालीं सूर्यावर पुष्कळ डाग दृष्टीस पडत होते; आणि त्याच वेळेस पृथ्वीवरील लोहचुंबकाचे चमत्कार आणि उत्तर अरु- णोदयाचे चमत्कार नेहमींपेक्षां विलक्षण पाहण्यांत आले. दुसरी एक विशेष गोष्ट सूर्यावरील डागांविषयीं विचार कर ण्यासारखी आहे. ती अशी, हे डाग कांहीं वर्षे अधिक अधिक होत जाऊन, पुढें कांहीं वर्षे कमी कमी होत जातात, आणि पुनः पहिल्याप्रमाणें अधिकाधिक होत जातात. याप्रमाणे उत्तर ध्रुवाकडे तेजाचे मोठमोठे पुंज कधीं कधीं दिसत असतात. त्या वेळीं अरुणोदयाप्रमाणें प्रकाश पडतो. ह्मणून, यास उत्तर अरुणोदय असें नांव दिले आहे. या चमत्कारास इंग्रजीत 'अरोरा बोरियालिस' असें ह्मणतात.