पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्य. नुसत्या डोळ्यांनीं सूर्य चकचकीत निष्कलंक दिसतो. परंतु, दुर्बिणींतून पाहिले असतां, सूर्यावर लहान मोठे पुष्कळ डाग दृष्टीस पडतात. सूर्यावर अत्यंत तेजोमय वातावरण आहे, आणि त्या वातावरणाचे छिद्रांतून सूर्याचा आंतील काळा भाग दृष्टीस पडतो. यावरून हे डाग सूर्याचे पृष्ठभागावरील मोठीं भगदाडें असावीत, असें हल्लींचे कांहीं ज्योतिषी समजतात. परंतु याविषयीं अद्याप मतभेद आहे, आणि निश्चयात्मक असें कांहींच समजलें नाहीं. सूर्यावरील डागांचा शोध प्रथम ग्यालिलियो या विख्यात ज्योतिष्यानें लाविला. त्यापूर्वी सूर्य हा निष्कलंक आहे असे समजत असत. सूर्यावर डाग आहेत असें ज्या वेळीं ग्यालिलियो यानें प्रथम प्रसिद्ध केलें, त्या वेळेस लोकांनी त्याची फार निर्भर्त्सना केली. 'सूर्य हा ईश्वराचा डोळा आहे; तेव्हां, सूर्यावर डाग आहेत ह्मणजे या ईश्वराचे डोळ्यांत फूल पडलें आहे, असें जो ह्मणतो तो नास्तिक व पाखंडी आहे;' अशीं त्या वेळचे लोकांनीं ग्यालिलि योस फार नांवें ठेविलीं ! सूर्य आणि त्याच्यावरील डाग दुर्बि- णींतून कसे दिसतात, हें आकृति ७ येथें दाखविले आहे. सूर्यावरील डागांचा वेध घेऊन असे शोधून काढिलें आहे कीं, सूर्य हा आपल्या आंसावर फिरत असतो; आणि त्याचा एक फेरा पुरा होण्यास सुमारें २६ दिवस लागतात. सूर्यावरील डागांचा आणि पृथ्वीवर लोहचुंबकाचे आणि उत्तर ध्रुवाक-