पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १५. पडणारे तारे आणि उल्का. एखाद्या काळोख्या रात्रीं स्वच्छ निरभ्र आकाशाकडे आपली दृष्टि सहज गेली असतां, एखादा तारा पटकंन् तुटून लक्कन् त्याचा उजेड पडतो आणि तो एकदम नाहींसा होतो, असें आपल्या पाहण्यांत येतें. मुले कोलीत फिरवीत असतां जशी त्याच्या तेजाची रेषा दिसते, तशी या पडणाऱ्या ताऱ्याच्या तेजाची रेषा, तो तारा नाहींसा झाल्यावरहि मागें थोडा वेळ कधीं कधीं अंतरिक्षांत दृष्टीम पडते. याप्रमाणे दररोज रात्री एका तासांत सुमारे २५ तारे पडलेले पाहण्यास सांपडतात. रोज रात्री कांहीं तरी तारे पडत असल्यामुळे ज्यानें एकहि तारा पडतांना पाहिला नसेल, असा मनुष्य क्वचितव सांपडेल. आवशीपेक्षां व मध्य- रात्रीपेक्षां पहाटेस अधिक तारे पडतात. आणि कांहीं कांहीं