पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नेपूच्यून. १६७ नेप्च्यूनला सूर्याभोंवतीं एक प्रदक्षिणा पुरी करण्यास १६५ वर्षे लागत असल्यामुळे, या ग्रहावरील एक वर्ष आपल्या १६५ वर्षांएवढे असतें हें उघड आहे. तेथील लग्नास योग्य झालेल्या 'अष्टवर्षा' मुलीचीं आपल्या पृथ्वीवरचीं १३२० वर्षे झालीं ह्मणावयाचीं ! गौतम बुद्धाच्या काळीं ज्याचा जन्म नेप्च्यूनवर झाला असेल, त्याचें वय आज तेथें १४ वर्षाचेंच मात्र असेल ! इसवी सन १६२७ या सालीं श्री शिवाजी महाराजाबरोबर जें मूल नेप्च्यूनवर जन्मास आलें तें आजला पुरतें दोन वर्षांचेंहि झाले नाहीं, तोंच येथें पृथ्वीवर आपल्या मराठी राज्याचा उदय, भरभराट व लय हीं सर्व होऊन गेलीं; आपल्या पूर्वजांनी मिळविलेले स्वातंत्र्य गेलें; व त्यावर आणखी आजपर्यंत ७५ हून अधिक वर्षे झालीं ! नेप्च्यूनला एक चंद्र आहे असें आढळून आले आहे. या चंद्राचें नेप्च्यूनपासून अंतर २ लक्ष ६० हजार मैल आहे. आणि हा चंद्र युरेनसाच्या चंद्रांप्रमाणें पूर्वेकडून पश्चिमेकडे नेप्च्यूनभोंवतीं फिरतो. नेप्च्यूनभवर्ती एक प्रदक्षिणा कर- ण्यास या चंद्रास २ दिवस ५ तास लागतात.. नेपच्यून ग्रहावरून सूर्य फारच लहान दिसतो. व या ग्र हाला सूर्याचा प्रकाश व उष्णता हीं फारच थोडीं मिळतात. सूर्यमालेतील मुख्य ग्रहांवरून सूर्य केवढा दिसतो हें स्पष्ट ध्यानांत यावे ह्मणून ३० वी आकृति दिली आहे.