पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिशिष्ट-५
 

शेतकरी संघटना

शपथ
मी शपथ घेतो की,
शेतकऱ्याचे लाचारीचे जिणे संपवून
त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे
सन्मानाने व सुखाने जगता यावे
याकरिता
'शेतीमालाला रास्त भाव'
या एक-कलमी कार्यक्रमासाठी
संघटनेचा पाईक म्हणून
मी सर्व शक्तीने प्रयत्न करेन.
या प्रयत्नात पक्ष, धर्म, जात वा इतर कोणत्याही भेदाभेदांचा
अडथळा येऊ देणार नाही.


(शेतकरी संघटनेच्या प्रत्येक सभेत सर्वजण उभे राहून, वळलेली मूठ उंचावत, सामुदायिकरीत्या ही शपथ घेत.)




अंगारवाटा...शोध शरद जोशींचा ...५०९

अंगारवाटा... शोध शरद जोशींचा५०९