पान:अंगारमळा (Angarmala).pdf/198

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मनमाडच्या बैठकीनंतर मी बापूंच्या घरी गेलो होतो. त्यांच्या गृहीणींना म्हणालो, "वर्षभर बापूंना तुम्ही संघटनेच्या कामाकरिता मोकळे केले तुमचे आभार कसे मानू ?" उत्तर साधे सरळ, "साहेब मुलं लहान आहेत म्हणून, नाहीतर आम्हीपण संघटनेकरिता बाहेर पडलो असतो."

 

(शेतकरी संघटक, १९ एप्रिल १९८५)

■ ■ 

अंगारमळा \ १९८