Jump to content

पान:अंकगणित.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वजाबाकी. ४ उ. १४५६७८९१२३ + ५६७८९५६ ७८९ + १७ = काय ! ५ उ. १ + ११ + १११ + ११११ + १११११ + ११११११ = काय? ६ उ. एका घरांत १२ पुरुष, ११ बायका, १७ मुलगे, ९ मुली, आणि २५ चाकर होते, तेव्हां एकंदर माणसांची संख्या काय? ७ उ. एका काळे पलटणींत १ कर्नल, १ लेफटेनेन्ट कर्नल, १ मंजर, ५. क्यापटन, १० लेफटेनेन्ट, ५ इनसाईन, १ डाक्टर, १ आ सिस्टंट डाक्टर, १० सुभेदार, १० जमादार, १ सर्जेटमेजर, १ क्वार्टर मास्तर, १० कलर हवालदार, ४० हवालदार, ५० नाईक, २० द्रमर, ८०० शिपाई, १० भिस्ती, २५ मुलंगे शिपाई, इतके असामी होते तेव्हां एकंदर किती मनुष्यें झालीं ! ८ उ. आझी बाजारांत गेलो तेव्हां पुष्कळ जातींचीं फळे आली होतीं, त्यांत ५२५ फणस, १७ कांकड्या, २७८८७ केळी, ५६७८ शिताफळें, ३८६७ नारिंग, ९९१२ जांब, २१२ भोपळे, ४४४४४ अंजीर, अशीं होतीं, तेव्हां एकंदर फळें किती झाली ? ९ उ. माझा जन्म शके १७४३ त झाला, आणि १७ वे वर्षी माझं लभ झाले, व पुढे ८ वर्षांनी मुलगा झाला, तेव्हां तो कोणते साली झाला तें साग. वजाबाकी. एका संख्येपेक्षां दुसरी त्याच जातीची संख्या किती लहान किंवा किती मोठी आहे हैं पाहणें अथवा मोठींतून धाकटी काढून टाक यास वजाबाकी म्हणतात. रीति-मोठ्या रकमेखालीं लहान रकम मांड, अशी कीं, एकं खालीं एकं, दहंखालीं दहं याप्रमाणे एकाखाली एक अशीं स्थानें येतील. नंतर त्याचे खाली रेघ काढून वजाबाकीस आरंभ करावा. प्रथम वरच्या रकमेतील एकंतून खालच्या रकमेंतील एकं, बजा करून अंतर येईल तें रेघेखालीं मांडावें. नंतर ह्याच प्रमाणे दहं शतं, सहस्त्र, इ० ह्यांची अंतरे रेघेखाली मांडावीं, जर खालचे ओळींतील अंक वरच्या ओळींतील अंकांपेक्षां मोठा