पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/35

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
करमणूक : वाङ्म़यीन अभ्यास
 

 काशीताई कानिटकर म्हणतात, 'करमणूक पत्र सारखे दुसरे पत्र आजपर्यंत माझ्या पाहण्यात नाही. निदान महाराष्ट्रात तरी नाही.

 असाच अभिप्राय वि. सी. सरवटे यांनीही व्यक्त केला आहे.

 करमणूक त्याच्याइतके लोकप्रिय, मनोरंजनाबरोबर ज्ञान देणारे, उच्च कोटीचे अभिजात अभिरुचीचे दुसरे कोणतेही साप्ताहिक मराठीत झाले नाही. (पान. ३५६) 'थोडक्यात पुष्कळ' या सदराच्या नावाप्रमाणेच देणारे १ एप्रिल, १९११ ला वसंत अंक काढलेले, शकुंतला व मिरांदा' (११/८/१९०६) 'विदग्ध वाङ्म़य आणि भाषा' (१९१०) अशा लेखातून समृद्ध वाङ्म़य विचार मांडणारे (करमणूक : १९१०-११) करमणूक साप्ताहिक असले तरी कर्झनशाहीच्या जुलमाचे कोठेही पडसाद त्यात कसे उमटले नाहीत, ते संपूर्णपणे राजकारणापासून कसे अलिप्त, सोवळे व सोज्वळ राहू शकले याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. संपादकाच्या निग्रही व सौम्य व्यक्तिमत्त्वातच याचे कारण दडलेले आहे. राजकीय व सामाजिक गदारोळात भाग न घेता 'करमणूक'न संपूर्णपणे वाङ्म़यीन स्वरूपाचे कार्य करून दाखविले ही हरि नारायण आपटे यांची केवळ अजोड संपादकीय किमयाच म्हणावी लागेल त्यामुळे पुढे जी वाङ्म़यीन नियतकालिके निघाली त्याची सुरवातीची पायाभरणी हरिभाऊंच्या 'करमणूक' ने केली असे म्हणता येईल.

अभ्यासाची साधने-

१) मराठी नियतकालिकाचा इतिहास (१८३२-१९३७)/ रा. गो. कानडे, कर्नाटक पब्लिसिंग हाऊस मुंबई, १९३८.
२) मराठी साहित्य समालोचन / वि. सी. सरवटे, सी. ना. गवारीकर, खंड १-२, मराठी साहित्य संमेलन २० वे, इंदूर १९३७.
३) मराठी वृत्तपत्रांचा इतिहास रा. के. लेले, कॉन्टिनेंटल पुणे, १९८४.
४) मराठी वाङ्म़याचा इतिहास (खंड ५/भाग १)/संपा० रा. श्री. जोग म.सा.प. पुणे. १९७३.
५) मराठी नियतकालिकांचा वाङ्म़यीन अभ्यास (खंड १)/ संपा. व. दि. कुलकर्णी, मुंबई विद्यापीठ व श्रीविद्या पुणे, १९८७.
६) रत्नाकर-साहित्यसूची (१९२६-१९३३)/डॉ. शुभांगी वाड, १९८७.
७) हरिभाऊ डॉ ल. म. भिंगारे, स्कूल कॉलेज, कोल्हापूर, १९५६.
८) हरिभाऊ विविध दर्शन/ म. ना. अदवंत, स्कूल कॉलेज कोल्हापूर, १८८६.
९) मराठी कथा : उगम आणि विकास/डॉ. इंदूमती शेवडे, सोमया पब्लिकेशन्स, मुंबई सं व. सु. आ. १९८२.
१०) धार आणि काठ/नरहर कुरुंदकर देशमुख, पुणे. १९७१ ११) मराठी नियतकालिकांची सची (१८०० ते १९५०)/ संपा० दाते/काळे/बर्वे, पुणे.
१२) मराठी ग्रंथसूची/दाते शं. ग. पुणे, १९४३.