पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२२
करमणूक : वाङ्मयीन अभ्यास
 

 चंद्रगुप्त (१९०२-०४)
 गड आला पण सिंह गेला (१९०३---)
 सूर्योदय (१९०५-०६)
 मध्यान्ह (१९०६-०८)
 सूर्यग्रहण (१९०८-०९)
 कालकूट (१९०९-११)
 वज्राघात (१९१३-१५)

 'कर्नल मोडौंज टेलर' यांच्या 'टिपू सुलतान'चे रूपांतर ' म्हैसूरचा वाघ' आहे. 'उषःकाल', 'सूर्योदय, सूर्यग्रहण,' व 'गड आला पण सिंह गेला.' या ४ कादंबऱ्या शिवकालीन आहेत. तर बाकीच्या मराठेतर इतिहासाशी निगडीत आहेत. महत्त्वाचे म्हणजे हरिभाऊंनी, ऐतिहासिक सत्य नसून ऐतिहासिक सत्यकथाभास या ऐतिहासिक कादंबऱ्या आहेत? ही जाणकार समीक्षकाची भूमिका निभावली यातच त्यांच्या 'वज्राघात' सारख्या अजोड ऐतिहासिक कादंबरीच्या यशाचे रहस्य दडलेले आहे.

 हरिभाऊंच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपली संविधानके महाराष्ट्राबरोबरच उत्तरेस हिमालयापासून दक्षिणेस विजयनगर; म्हैसूरपावेतो, पूर्वेस मगधापासून, पश्चिमेस राजस्थानापावेतो, इ. स. पूर्व पंचवीस वर्षापासून इसवी सनाच्या अठराव्या शतकाच्या अखेरपावेतो विविध कालांचा आणि देशाचा आवाका त्यांनी पेलला.

 यथातथ्य चित्रण करणारा वास्तववादी, सामाजिक कादंबरीकार, तेवढयाच यशस्वीपणे ऐतिहासिक कादंबऱ्यांची निर्मिती करतो याचे हे विशेष लक्षणीय उदाहरण म्हणावे लागेल. ऐतिहासिक वातावरण निर्मितीत त्यांचा हातखंडा होता. त्या दृष्टीने हरिभाऊ ऐतिहासिक कादंबरीचे अध्वर्यु शोभतात.

'करमणूक' मधील कविता-

 'करमणूक 'मध्ये निदान एक तरी कविता प्रत्येक अंकात हमखास असे. वर्षभरात ४० ते ५० कविता दिल्या जात. शेवटी शेवटी कविता विभागात मात्र विशेष भर पडत गेली आणि नावानिशी कविता प्रसिद्ध केल्या गेल्या. परंतु प्रारंभी कवीचा नामोल्लेख नसे. कालावधी-लेखनकाल दिलेला नसे. दिलेच तर कवीचे टोपण नावच प्रामुख्याने असे. या टोपण नावाच्या यादीत 'त्र्यंबक', 'उद्धव', 'शिवतनया', 'माधवानुज', 'चिंतामणी', 'धर्मभगिनी', 'जनार्दन', 'वामन', 'द. पं. चिं.', 'आनंदीरमण', 'विद्यावन विहारी', 'कवी गोविंदाग्रज', 'देशमुख', 'भास्कर',