पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
करमणूक : वाङ्मयीन अभ्यास
२३
 

'यशवंत', 'नारायण', 'जगन्नाथ', 'दत्तात्रय', 'साधुदास', 'रेंदाळकर, 'चंद्रशेखर', 'वसंत माधव', 'टिळक ' अशी कितीतरी नावे आहेत. मात्र यावरून या कविता नेमक्या कोणाच्या? काव्येतिहासात त्याच्या नोंदी करणे अवघड होऊन बसते. त्यात 'केशवसुत', 'चंद्रशेखर ', 'गोविंदाग्रज', 'रेंदाळकर', 'टिळक' यासारखे नामवंत कवी आवर्जून आलेले आहेत हे विशेष. 'पुष्पाप्रत', 'कविता आणि प्रीति', 'फुकट दवडलेला तास', 'दिव्य ठिणगी', 'भृंग', 'शर्मिष्ठा संवाद' अशा कितीतरी नामांकित कवींच्या लक्षणीय कविता 'करमणूक' मधून छापलेल्या आढळतात. महत्त्वाचे म्हणजे या कविता सुरस आहेत आणि संस्कारक्षम आहेत. आणि तशा त्या असाव्या असा संपादकांचा कटाक्ष दिसतो. क्वचित मा. ना. पाटणकर सारख्यांच्या प्रासंगिक कविताही छापलेल्या आहेत. उदा० 'झारसाहेबांचे दुःखोद्ग़ार.'

 'परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे उद्ग़ार' सुसंस्कारक्षम कवितेचा नमुना म्हणून हा एक 'आंबट गोड श्लोक' पाहण्याजोगा आहे.

'कंठी माळ जरी पडेल न कधी माझ्या तिच्या हातची
आशावृक्ष समूळ तोडुनि जरी माझा तिने टाकीला
नैराश्यात सदैव पोहत-बरे वाटे मला-राहणे
स्त्रीचा अन्य परंतु वास न लगे चित्रांत कृष्णेविना.'

(करमणूक दि. १४१४।९२)

 किंवा काव्यरूपाने दिलेले कोडेही सुंदर शब्दच्छल करणारे आहे. त्याचा नमुना- कोडे उकला.'

" मधुत्व शर्करेचे
हरिता लागेल ती कशी गोड?
वेडाच राहतो मी
जर माझें दूर सारिले वेड!'

उलगडा-

 'खुळखुळा' या शब्दांतील खुळ (वेड) काढून घेतले तरी खुळा (वेडा) कायम तो कायमच राहतो.

(वर्ष दुसरे : अंक २७ वा.)

 पण असल्या स्फुट कवितेबरोबरच मराठी कवितेच्या इतिहासातील मानदंड म्हणविले जाणारे कवी आणि त्यांच्या कविता 'करमणूक' मधून प्रसिद्ध झाल्या. रसिकांच्या आदरास पात्र ठरलेल्या या कविता आणि कवी आहेत. हरिभाऊंचा साहित्यिक मित्रपरिवार आणि लोकसंग्रह याला कारणीभूत दिसतो. 'भृंग' कविता