पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/216

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेबोहरून काही नको म्हणणारे; याउलट, जोतिबा फुले, रानडे यांच्यासारखे बाहेरून आपण ज्ञान घ्यावं आणि 'एकमय लोक' या अर्थी राष्ट्र बनवावं आणि मग स्वातंत्र्याच्या मागे लागावं. असं म्हणणारे, दुर्दैवाने स्वदेशीच्या या पहिल्या लढाईमध्ये 'स्वदेशी'वाल्यांचा जय झाला आणि पहिल्यांदा सामाजिक प्रश्न सोडविण्यावर भर देणारांचा पराभव झाला.
 दुसरी लढाई
 स्वातंत्र्य आलं आणि जोतिबा फुल्यांचं भाकित खरं ठरलं, दिल्लीत पुन्हा एकदा 'पेशवाई' स्थापन झाली. सुरुवातीला म्हणजे १९४७ सालापासून ते जवळजवळ १९८० सालापर्यंत दिल्लीची ही 'पेशवाई' जातीनंसुद्धा सवर्णांचे वर्चस्व असलेलीच 'पेशवाई' होती. नंतर हळूहळू इतर जातीचे लोक येऊ लागले; पण जर का 'पेशवाई' किंवा 'भटशाही' याचा अर्थ, “समाजातील एका गटानं त्याच समाजातील दुसऱ्या गटाचं शोषण करण्याची व्यवस्था जन्माच्या अपघाताने ठरलेल्या जातीच्या आधाराने चालवणे." असा घेतला तर दिल्लीमध्ये १९८० नंतर आलेली व्यवस्थासद्धा समग्र राष्ट्राची राहिली नाही. ती समाजाच्या एका गटाचीच राहिली. जोतिबा फुल्यांनी 'भटशाही' हा शब्द वापरला. मी जोतिबांवर लिहिलेल्या पुस्तकाच्या शेवटी लिहिलं आहे की, “जोतिबांचं भाकित खरं ठरलं. 'भटशाही' पुन्हा एकदा प्रस्थापित झाली. फरक एवढाच की त्या 'भटशाही'चं स्वरूप आता ब्राह्मण विरुद्ध शूद्र असं न राहाता 'इंडिया' विरुद्ध 'भारत' असं झालं आहे." वेगवेगळ्या जातिपातींच्या काही लोकांना 'भटशाही'ने फितूर करून घेतले.

 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 'स्वदेशीची दुसरी लढाई' सुरू झाली. या लढाईची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. पहिल्या लढाईच्या काळात हिंदुस्थानातील, बूट घालणाऱ्या, सूट घालणाऱ्या. टाय बांधणाऱ्या गटाचे काँग्रेस स्थापन केली आणि त्या काँग्रेसला असं स्थान प्राप्त झालं की लोकमान्य टिळकांनाही वाटलं की, आपल्याला जर का 'राष्ट्रीय चळवळ' चालवायची असेल तर ती काँग्रेसच्या झेंड्याखालीच चालवायला लागेल. इतरही काही लोकांनी पक्ष काढले होते; पण ते सर्व कोपऱ्यात दबून राहिले. गांधीजींनीसुद्धा आफ्रिकेतून आल्यानंतर महत्त्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्याचं साधन काँग्रेसच राहणार आहे, ती ताब्यात घेतली पाजि, काँग्रेसमधून बाहेर पडायचं नाही. बाहेर पडतील ते संपतील.' सुभाषचंद्र बोस असोत किंवा आणखी कोणी असो-काँग्रेस सोडून जे जे गेले किंवा मध्यप्रवाहापासून जे जे दूर गेले तेते सर्व निष्प्रभ झाले; जे

भारतासाठी । २१६