पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/217

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चापलुशी करत, कधी महात्मा गांधी काँग्रेसमध्ये चिपकून राहातात तेच यशवंतराव चव्हाणांसारखे 'महद्पदला पोहोचतात असा काँग्रेसचा इतिहास आहे.
 महात्मा गांधी काँग्रेसमध्ये आल्यानंतर ती ताब्यात घेण्यासाठी त्यांनी काही गोष्टी केल्या. त्यातील महत्त्वाची गोष्ट - काँगेस ही जर का स्वातंत्र्याचं महत्त्वाचं साधन बनायचं असेल तर तिचं 'सूट-बूट-टाय' हे स्वरूप गेलं पाहिजे. महात्माजींनी मोठ्या विचारपूर्वक 'पंचा' स्वीकारला, केवळ शहरी लोकांच्या आर्थिक मागण्या मांडायची परंपरा मोडून ग्रामव्यवस्थेविषयी बोलायला सुरुवात केली; विधायक कार्यक्रम दिले, त्याबरोबरच सामाजिक सुधारणांचे कार्यक्रम दिले, अस्पृश्यतेला खंबीरपणे विरोध केला.
 या वेळेपर्यंत स्वदेशीच्या पहिल्या लढाईतील 'राष्ट्रीय' गटाकडून 'स्वातंत्र्य' गट पूर्ण पराभूत होऊन कोपऱ्यात जाऊन पडला होता. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात 'सत्यशोधक समाज' कुठेतरी खेड्यापाड्यात समाजाच्या विधीनुसार विवाह लाव किंवा किरकोळ सभामेळावे भरव यापलीकडे काही करू शकत नव्हते. 'फुले' गट संपलेला होता, 'राष्ट्रीय' गटाने आघाडी मारली होती.
 गांधीजींचे विचार आणि कार्यक्रम पाहता कोपऱ्यात जाऊन पडलेल्या या बहुजन समाजाच्या लोकांना पहिल्यांदा वाटू लागलं की, टिळक इत्यांदीचा राष्ट्रीय गट आणि गांधीजींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस यांच्यात मोठा फरक आहे. गाधीजी जे बोलताहेत ते समाजसुधारणेबाबत बोलत आहेत. पंचा नेसून रहात आहेत. (सर्वसामान्यांसारखे रहात आहेत.) त्यांना गरीबाविषयी कळवळा आहे, गावाचं अर्थकारण यांना समजत आहे; शुद्र आणि ब्राह्मण यांच्यातील अन्याय आहे त्यांना असजतो आहे. त्यांचा परिणाम म्हणून एक मोठी घटना घडली-महाराष्ट्रात घडली. १९३६ साली जळगाव जिल्ह्यात फैजपूर येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशाच्या वेळी बहुजन समाजाच्या नेतृत्वाने मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची भमिका अशी होती की, राष्ट्रीय चळवळ गांधीच्या नेतत्वाखाली उभारी घेत आहे. पुढेही फोफावणार आहे. सामाजिक विरुद्ध राजकीय वाद निरर्थक झाला आहे. पहिल्यांदा समाजसुधारणा, परदेशातील ज्ञानविज्ञान-तंत्रज्ञानाशी संपर्क साधणे आणि नंतर स्वराज्य हे काही आता शक्य नाही; पण काँग्रेसमध्ये सध्या गांधीजींच्या विचाराचा प्रभाव आहे. आपण त्यांच्या बरोबर जावे. अन्यथा, 'इंग्रजधार्जिणे', 'देशद्रोही' असल्याचा डाग लागले. महाराष्ट्रातील सारी सत्यशोधक चळवळ ही भूमिका घेऊन काँग्रेसमध्ये मिसळून गेली.
 १९४७ साली स्वतंत्र्य मिळालं, शेतीवर आधारलेली व्यवस्था आणि त्यांची

भारतासाठी । २१७