पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/124

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेतर लवकर येते. ओळख नसेल तर सावचितपणे येते. शेतकरी झपाट्याने जाऊन पैशाचा भरणा करतो आणि आज, उद्या आता वीज येईलच अशा आशेने दिवस मोजत राहातो; म. रा. वि. मं. च्या कार्यालयात खेटे घालत राहतो. दोनपाच वर्षांच्या खालीतरी वीज येण्याचे नावचे काढायला नको. अधिकाऱ्यांचा होत ओला केला तरच विजेचे दर्शन होण्याची शक्यता. गेलाबाजार ५००० रुपयांचा अधिकाऱ्यांच्या मलिद्याचा दर होता.
 वीज आली म्हणजे प्रश्न सुटला नाही; खरा प्रश्न येथेच चालू होतो. जुन्या इंजिनाला आडगिहाईकी बाजारात विकून टाकून नव्या छानछोकी घरोब्याचे कौतुक दोन दिवसही चालत नाही, तोच या नवीन वयेच्या लहरीपणाचा फटका बसू लागतो. दिवसातून केव्हा येईल, केव्हा जाईल सांगता येत नाही. मोटर चालवायला लागणाऱ्या तीनही फेजेस एकत्र नांदू इच्छीत नाहीत. एखादी तरी चुकारपणा करत राहते. विजेचा दाब कधी एकदमच कमी, कधी एकदमच भडकणारा. पेरणीसाठी पाणी देण्यासाठी माणसे मिनतवारी करून गोळा केली की त्या दिवशी हमखास ही बया बेपत्ता होणार! आलीच तर अशा ठसक्यात की, मोरच जळून जावी. मोटर दुरूस्त करण्याचा खर्च पेलण्यासारखी असामी असली तरी मोटर पुन्हा चालू होईपर्यंत पाणी बंद. पिकाचे जे काही नुकसान होईल त्याला कुणी जबाबदार नाही. दिवसाउजेडी विजेची हजेरी कारखान्यात; शेताला पाणी द्यायला वीज मिळाली तरी ती रात्री. कडाक्याच्या थंडीत रात्री पाणी धरायला उभे राहाणे हा शेतकऱ्यांच्या आयुष्यातील मोठा रोमांचक भाग! उत्तरेत हरियाणा पंजाबमध्ये कडाक्याच्या थंडीत पाणी देताना पाणी देणारे गारठून मेल्याची उदाहरणे वारंवार घडतात. सर्वसाधारण शेतकऱ्याचा विजचा अनुभव हा असा आहे.
 सुधारलेल्या देशात वर्षानुवर्षे वीज एकदाही बंद पडत नाही; दाबामध्ये फरक जवळजवळ नाही. वीज ही हवी तेव्हा सेवेला हजर असते असे इथल्या कोणा लोकांना सांगितले तर कुणाचा त्यावर विश्वास बसणार नाही.
 महाग वीज

 बिनभरवशाची वीज अधिकाधिक महाग होत चालली आहे. गेल्या तीन महिन्यात आंध्र प्रदेशातील विजेचे दर ५० टक्क्यांनी वाढले; कर्नाटकात ३३ टक्क्यांनी महाराष्ट्रात जाहिरात झाली सरासरी साडेसतरा टक्के वाढीची. बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतीतील पंपासाठी मिळणाऱ्या विजेचा दर ६६ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. ही गोष्ट साधीसुधी नाही. यामागे फक्त महाभयानक अरिष्टाची

भारतासाठी । १२४