मूल्यांचा संग्रह
कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तित्व त्यांच्यात असलेल्या गुणामुळे /मूल्यांमुळे उठून दिसते. शशीताई बऱ्याच जणांसाठी एक आदर्श, प्रेरणादायी व्यक्ती होत्या. त्यांच्या काही निकटवर्ती, स्नेही, सहकारी ह्यांनी अनुभवलेले गुण आणि मूल्ये, त्यांच्याच शब्दात.
सी.डी.ए. च्या अध्यक्षा जयाप्रदाजी शशीताईच्या मूल्यांबद्दल सांगतात,
“जर सर्व सद्गुण व मूल्यांना एकत्रित केले आणि त्यांना मानवी रूप दिले तर त्या शशीताई होतील. कोणतीही व्यक्ती संपत्ती मिळवेल पण खूप कमी लोक मूल्याधिष्ठीत जीवन जगू शकतात. आणि असे जगणे सोपे नाही. शशीताई भाग्यवान होत्या. त्या अतिशय अर्थपूर्ण जीवन जगल्या. शशीताईंना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर कर्करोगाने ग्रासले होते. पण तरीसुद्धा, त्यालाही न जुमानता त्यांनी शेवटपर्यंत जे काम केले आणि मृत्युला सामोऱ्या गेल्या.” म्हणून जयाप्रदाताईंनी 'मृत्यूलाही आदेश' (Command over death) दिला असे म्हटले आहे.
उक्ती आणि कृती मधे एकवाक्यता असलीच पाहिजे असे शशीताईंचे ठाम मत होते. आपण ज्या सूचना देतो त्या स्वत: आपण प्रत्यक्षात, अंमलबजावणीत आणल्या पाहिजेत यासाठी त्यांचा आग्रह असे. त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आर.बी.आय.) पदाधिकारी या नात्याने सभेत सहभागी व्हायच्या. त्यांच्या असे जाणवले की, सभा मुख्य कार्यालयात न होता वेगवेगळया ठिकाणी व्हायला पाहिजेत. आर.बी.आय.ने हे म्हणणे ऐकले व त्याची अंमलबजावणी केली. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्या खूप आजारी होत्या. त्यावेळी आर.बी.आय.चे सभास्थळ लांब अंतरावर होते व तिथे पोहोचायला वेळ लागणार होता. परंतु तरीही त्या सभेला पोहोचल्या.
हक्क मिळवण्यासाठी आग्रही
श्रीयुत बाळकृष्ण यांनी यासंदर्भातील एक आठवण सांगितली आहे.
“एकदा असे झाले की, एक बँक शेतकरी गटाचे खाते उघडायला उत्सुक नव्हती. एका ग्रामीण भागातील राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेमध्ये प्रयत्न चालले होते. कोणी सहजपणे खाते उघडू शकत नव्हते. तेव्हा मी खूप हताश होऊन शशीताईना ते