पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सांगितले. त्यांनी लगेचच बँकींग लोकपालांना फोन केला. ऑफिसरने थोड्याच तासांमध्ये त्यांच्या मदतीने कुठल्या शाखेकडून सहकार्य मिळत नाही ते शोधून लगेच त्याचा पाठपुरावा केला. पुन्हा एकदा प्रयत्न केला. शेतकरी गट त्या बँक मॅनेजरकडे गेले आणि त्यांनी हेही सांगितले की हे जर झाले नाही, तर आमचे संचालक, बँकींग लोकपालांकडे जाणार आहेत. ह्या शब्दांनी जादूच केली. हे शब्द ऐकताच एकदम व्यवस्थापकांची बोलण्याची पट्टीच बदलली. ते एकदम साखर तोंडात असल्यासारखे गोड बोलू लागले. आणि खाते लगेच उघडले गेले. आम्हाला हे सहकार्य शशीताईंच्या मार्फत आर.बी.आय.कडून मिळाले नसते, तर आम्ही कदाचित हे कधीच करू शकलो नसतो.

 या निमित्ताने आपण बँकांना जाब विचारू शकतो अशी एक व्यवस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कक्षेत आहे असेही लक्षात आले.

सत्य बोलण्याचा आग्रह कायम

 सत्तेत असणाऱ्यांसमोरही सत्य बोलले पाहिजे. ग्रामीण, शहरी महिलांच्या बाबतीत आणि त्यांच्या प्रश्नांच्या बाबतीत त्या मोकळेपणाने चर्चा करायच्या. आणि त्या सक्षम कशा होतील हे पाहायच्या. एकदा शाश्वत शेतीसबंधी विचार मंथनची एक बैठक नाबार्डने बोलावली होती. बाळकृष्णांच्या जीवनसाथी विजयालक्ष्मीताईंना शशीताईंनी बोलावले होते. त्या मिटिंगनंतर जेव्हा शशीताईंबरोबर ह्या सभेत काय साध्य झाले यासबंधी चर्चा झाली तेव्हा शशीताईंनी सांगितले, “तुम्ही जे काही सांगितले ते १००% बरोबर होते. आपला संदेश पोहोचविण्यासाठी आपण मृदू व सौम्य स्वरात मांडणी केली तर आपले म्हणणे ऐकले जाईल.'

 त्या कधीही कोणत्याही दबावाखाली यायच्या नाहीत, मग हा दबाव सत्तेचा असला तरीही. म्हणूनच त्या नाबार्ड आणि आर.बी.आय.च्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून काम करू शकल्या. त्यांच्या गाठीशी सहकारातला आणि संस्थांचा अनुभव होता. त्यांची निरीक्षणे त्या पटकन सांगायच्या. जसे की क्षेत्रामधून येणाऱ्या मतांकडेही त्यांचे लक्ष असायचे, कोणाचाही मुद्दा दुर्लक्षित होणार नाही असे त्या बघायच्या. वंचित समाजाबद्दलची आंतरिक जाणीव व समज त्यांना होती. त्यांच्या ताकदीवर त्यांचा विश्वास होता. कोणतेही काम कितीही अवघड असो, कोणताही विषय कितीही अवघड असला तरी त्याची प्रभावी पध्दतीने मांडणी त्या करायच्या. जेव्हा

२३
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन