परिपूर्ती/बीज-क्षेत्र

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
बीज-क्षेत्र


'माझी लेक नवच्याशी भांडून त्याला काही

न कळवता घरी आली होती. नवरा मारतो व
सासू सारखी उणेदुरे बोलते असे ती सांगत होती.
मी जी संध्याकाळी कामावरून घरी येते तो
धाकटीने दाराशीच सांगितले, “आपली ताई
आली आहे." पाठोपाठच मैना आली, माझ्या
पाया पडली, व मला मिठी मारून, “बाई, आता
माझं कसं होणार?" म्हणून रडली होती. ती शांत
झाल्यावर मी पण बैठकीच्या खोलीतच लवंडले.
ती एकीकडे आपल्या एका वर्षाच्या अचपळ
मुलामागे धावत होती व एकीकडे मला घरची
हकीकत सांगत होती. मुलगा नुकताच
चालायला लागला होता. तो क्षणोक्षणी पडे, जरा
तोंड वाकडे करी, की परत उभा राहून डुलत
डुलत चालू लागे. तिने त्याला धरून ठेवले की,
सुटून जायची धडपड करीत डोके आपटून घेई.
असा प्रकार चालला होता. मी म्हटले, “कमाल
आहे बाई, तुझ्या गुंड पोराची! एवढ्यात दहादा
लागलं, पण स्वस्थ काही बसत नाही"
"त्याच्यावर तर किती भांडणं होतात! काल
त्याला पाजायला घेतला तर तो अशीच मस्ती

करीत होता, आणि एकदम उसळी मारलीन तर
३६ / परिपूर्ती
 

भिंतीवर डोकं आपटलं. मग सासूबाई खूप बोलल्या व त्यांनी मारलं." मैनेने खालच्या मानेने सांगितले. “अग, पण तू त्याची आई. तुला नाही का त्याची काळजी? सांगावं असं सासूबाईंना.' मैनेची मान वरती झाली, तिचे डोळे चमकले. भुवया रागाने आकुंचित झाल्या. तिने रुद्ध स्वरात उत्तर दिले, "मी तसं सासूबाईंना सांगितलं, तर त्या म्हणाल्या, “चूप-चूप, किती तोड करतेस? म्हणे आई! तू त्याला सांभाळणारी दाई आहेस दाई! म्हणे ‘पोसल माझ्या पोराला!' कुठचा तुझा पोर? तुझ्या कुणग्यात तो पोसला. कुळाच बीज रक्षण करायला दिलं. तुला खायला घातलं त्या अन्नावर तो पोसला. पहिल्यांदा आत पोसलास, आता बाहेर पोसतेस... दाई ती दाई, आणि वर मिजास पाहा!' पडल्या-पडल्याच मी तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला शात केले. पण मनाच्या त्या त्रस्त परिस्थितीतही मला आठवण हा क्षणभर हसू लोटले.
 "भस्त्रा माता पितुः पुत्रः येन जातः स एव सः।
 भरस्व पुत्रं दुष्यन्त मावमंस्थाः शकुन्तःलम्।।"
 "आई केवळ चामड्याची पिशवी आहे. मुलगा बापाचाच. बापच त्याच्या रूपे जन्म घेतो. हे दृष्यंत राजा, मलाला सांभाळ, शकुतलेचा धिक्कार करू नकोस."
 मैनाच्या सासूबाई आणि दुष्यंतराजा ह्यांच्यात किती बर अंतर. असेल. तीन-चार हजार वर्षांचे. पण हा चार हजार वर्षांच्या कालदरीने विभागलेले हे दोन जीव एकाच संस्कतीने कसे अगदी जवळ बाव होते!
 हाच तो बीजक्षेत्रन्याय. पण त्याचा उपयोग मात्र दुधारी शस्त्रासारख दुहेरी होई. दुष्यंताच्या परिस्थितीत जेव्हा एखाद्या स्त्रीशी लग्न झाल्याचा पुरावा देता येत नसेल- किंबहना लग्न झाले नसेल- तेव्हा ज्याचे बीज त्याचे संतान असा युक्तिवाद लढवून मुलावर हक्क सांगायचा आणि जेव्हा पुत्रोत्पत्तीची शक्ती नसेल तेव्हा क्षेत्रावर हक्क सांगून जे उगवेल ते शेताच्या धन्याचे म्हणून त्यावर हक्क सांगायचा व बऱ्यावाईट मार्गाने संतती मिळवायची असा पूर्वीचा राजमार्ग होता.
 मातृत्व ही एक नैसर्गिक घटना आहे. पितृत्व हा एक सामाजिक संकेत आहे आणि समाजात नैसर्गिक घटनांपेक्षा सामाजिक संकेतानाच जास्त

प्राधान्य असते - इतकेच नाही तर नैसर्गिक घटनांचा उपयोग सामाजिक
परिपूर्ती / ३७
 

संकेतांना बळकटी आणण्यासाठी होतो. विवाह हाही एक अतिप्रभावी सामाजिक संकेत आहे. त्यात मालकीहक्क आहे, वारसा आहे, संपत्तीच्या सर्व कल्पना केंद्रीभूत झालेल्या आहेत. जिच्याशी लग्न झाले, तिच्यावर नवऱ्याची सर्वस्वी मालकी असते व तिची संतती नव-याची होते. एकदा हा संकेत मान्य केला म्हणजे मूल कोणाच्या बीजाचे हा प्रश्न विवाहबंधनात झालेल्या संततीबद्दल उत्पन्न करून घोटाळा मात्र निर्माण होतो व पूर्वी ह्या प्रश्नाला फारसे महत्त्वही नव्हते. बायको लग्नाची नसली तरच कोणाचे बीज हा प्रश्न उदभवे. विवाहातील व विवाहबाह्य, औरस व अनौरस हे भेद हळूहळू निर्माण झाले.
 दुष्यंताच्या कथानकात- म्हणजे कालिदासाचे शाकुंतल नव्हे, तर महाभारतातील आख्यान- घटना मोठी मजेदार आहे. दुष्यंत कोण हे समजून शकुंतला त्याच्या गळ्यात पडली. टाकून दिलेल्या, आश्रमात वाढलेल्या या अनाथ महत्त्वाकांक्षी मुलीने मोठा डाव रचला, मोठे धाडस केले, पण बिचारीला तोंडघशी पडायची पाळी आली होती. ती मुलगा घेऊन राजाच्या राजधानीत गेली, पण राजाने तिला ओळखूनही जणू काही आपण त्या गावचेच नाही असे दाखवले. राजाने तिच्या आईचे चारित्र्य बाहेर काढले, तर शकुंतलेने त्याला दुरुत्तरे केली. ‘गाठ पडली ठकाठका' असा हा प्रकारे झाला. ती जीव तोडून त्याला दिलेल्या आणाभाकांची आठवण देत होती. ती म्हणे, “राजा, तू कितीही खोटं बोल. तुला कितीही वाटो की, त्यावेळी तर मी एकटा होतो, माझ्या कृत्याला साक्षी कोणी नव्हतं, पण सूर्य-चंद्र, जल

आणि अग्नी, आकाश आणि पृथ्वी, तुझं स्वत:चं हृदय आणि यमधर्म, दिवस-रात्र, सकाळ आणि सांज ही सर्व मनुष्याच्या प्रत्येक कृत्याचे निरीक्षण करतात बरं!" पण ही सर्व विनवणी व्यर्थ होती. राजाने त्या वेळीच तिला राजधानीत आणले असते तर लग्न न होताही ती त्याच्या अंत:पुरात राहती. पण आता इतक्या वर्षांनी केवळ मुलाच्या आशेने राजाने एका स्वैरिणीचा स्वीकार केला हा ठपका त्याला नको होता. ती त्याच्या घरी राहून मग तिच्या पोटी कोणाचेही पोर असते तरी त्यावर त्याची सत्ता होती. पण केवळ एका वेळी काही वर्षांपूर्वी मी हिच्याशी संगत केली होती असे म्हणून मुलावरील त्याचे पितृत्व सिद्ध होत नव्हते. म्हणून आकाशवाणी व्हावी लागली व मुलगा तुझ्या बीजाचा' अशी खात्री पटवून शकुंतलेला त्याला स्वीकारता आली. त्याच्या बीजाची संरक्षक म्हणून तिचे चोज, एरवी नाही.
३८ । परिपूर्ती
 

ह्याउलट विधिपूर्वक सर्वांच्या समक्ष लग्नाची बायको आणली म्हणजे तिच्या पोराच्या मालकीसाठी बीजकर्तृत्वाची मुळी गरजच लागत नव्हती. एकदा स्त्रीवर मालकी सिद्ध झाली म्हणजे मग तिला कुवारपणी, विधवापणी, आपणापासून वा इतरांपासून होणा-या सर्व मुलांचे पितृत्व नवऱ्याकडे असे.
 त्या वेळच्या स्त्रियांची कोण ही अनुकंपनीय अवस्था! छे:! आपल्या हल्लीच्या कल्पना त्या काळावर लादणे योग्य नाही. स्त्रीला आपला दीर म्हणजे हक्काचा प्रियकर वाटत असे. दिराबद्दल तिचे विचार काय असतील याची कल्पना हल्लीच्या काही लोकगीतांवरून चांगली करता येते. पुढे-पुढे हे नाते नाहीसे होऊन फक्त निपुत्रिक विधवेलाच संतती निर्माण करण्यासाठी दिराशी संबंध ठेवायची परवानगी होती
 येथर्यंत माझे विचार कसे यंत्रासारखे चालले होते! पण एकदम मला कसली तरी आठवण झाली. कसल्या तरी दु:खद विचाराने माझे हृदय थरारले. मला परत महाभारतातल्या ओळी दिसू लागल्या. त्या प्राचीन काळी एका स्त्रीवर एक भयंकर अत्याचार झाला होता व त्याचे चित्रण इतक जिवंत, इतके विदारक होते की, आजही नुसत्या आठवणीने माझे मन कस जळत होते! हा अत्याचार काही आताच्या मध्यमवर्गीय नीतिकल्पनाचे स्तोम माजवून मी मनाला भासवून घेतलेला नव्हता. त्या वेळच्या कवीलाही तो तसा वाटला होता.

 मी ताडकन उठले. मैनेने विचारले, “बाई. काय झालं? काही नाही ते समोरचं लठ्ठ पुस्तक आणून दे." आदिपर्वातून तो भाग उघडून मा परत वाचला. म्हाताच्या शंतनूने आपल्या पराक्रमी मुलाच्या सुखाचा अथवा देऊन एका शीलभ्रष्ट सुंदर पोरीशी लग्न केले होते. ती सत्यवती. तिला " मुलगे झाले. एक लग्नाच्या आधी मेला. दुसऱ्यासाठी भीष्माने काशीराजाच्या मुली आणल्या. त्यातली मोठी अंबा. तिने स्वत:ला जाळून घेतले, व दुस-या दोघींचे शंतनुच्या धाकट्या मलाशी- विचित्रवीर्याशा लग्न- लागले. म्हातारपणाचा हा मलगाही संतती न होताच मेला. आता पुढे कुलक्षय होणार म्हणून सत्यवतीने, "भीष्मा, तु लग्न तरी कर, नारी भावजयीला संतती तरी निर्माण कर" म्हणन हट्ट धरला. त्या मानी राजपुत्राने ते ऐकले नाही. तेव्हा सत्यवतीने निर्लज्जपणे आपला कुवारपणाचा वृतान्त सागितला व आपल्या मुलाला-व्यासाला- बोलावण्याचा बेत सांगितला. भीष्माने ह्या बेताला मान डोलावली. ह्यापढचा कथाभाग असा आहे; ही दुष्ट
 परिपूर्ती / ३९
 

सासू आपल्या थोरल्या सुनेला बोलावून मायावीपणे म्हणते, “कौसल्ये- (काशीकोसलची राजकन्या)- बाई, माझं बोलणं ऐक. आपला कुलक्षयच होणार होता. पण भीष्मानं मला युक्ती सांगितली आहे. नाही म्हणून नकोस. तुझं कल्याण होईल. त्या युक्तीप्रमाणे वागून पुत्राला जन्म दे व वंशवर्धन आणि राज्यवर्धन कर." ह्या मोघम बोलण्यात सत्यवतीने भीष्माचे नाव मोठ्या खुबीने गोवले आहे. “भीष्माची युक्ती" ह्या शब्दाने सुनेला वाटावे की, सासू पुत्रोत्पत्तीसाठी माझ्या शूर दिराची निवड करते म्हणून, व तशी आशा बिचाऱ्या अंबिकेच्या मनात उत्पन्न झाली असे कवीने पुढे स्पष्टच केले आहे. पुढच्या अध्यायाच्या पहिल्या चार कविता म्हणजे मला काव्याची परिसीमाच वाटते. त्या वाचताना जुनी व ने बुजलेली जखम परत वाहावी तसे मला होते. प्रत्येक चरणात किती चित्रे डोळ्यांपुढून जातात! आठच ओळींत एका पतित, भ्रष्ट वृद्धेचे कारस्थान, एका अभागी राजकन्येची सुंदर सुंदर स्वप्ने, तिची विटंबना व मानहानी इतक्या घटनांची हकीकत स्पष्ट मोजक्या शब्दांत, गूढपणाचे अवडंबर न माजवता दिलेली आहे.
 ततः सत्यवती काले वधू स्नातां ऋतौ तदा।
 संवेशयन्ती शयने शनकै: वाक्यमब्रवीत।।"
 "नंतर योग्य वेळी ऋतुस्नात अशा वधूला शय्यागारात पोहोचवताना सत्यवती खालील शब्द बोलली."
 कौसल्ये देवरः ते अस्ति सो अद्य त्वानुप्रवेक्ष्यति।
 अप्रमत्ता प्रतीक्ष्यैनं निशीय आगमिष्यति।।'
 "कौसल्ये, तुझा एक दीर आहे. आज तो तुझ्या ठायी येईल. विनयाने त्याची वाट पाहा, तो आज रात्री येईल."
 (नुसता ‘दीर' असा मोघम शब्द आहे. अंबिकेला आपल्या सासूचे पूर्वचरित्र माहीत नव्हते. 'भीष्माने युक्ती सांगितली आहे' असे सर्वस्वी खोटे ती आधी बोललीच होती. शिवाय आपण जो दुष्ट बेत योजला होता तो जणू काय भीष्माचीच युक्ती असेही तिला जगाला भासवायचे होतेच.)
 'श्वश्व्रास्तद्वचनं श्रुत्वा शयाना शयने शुभे।
 सा चिन्तयत्तदा भीष्ममन्यांश्च कुरुपुङगवान।।"
 "सासूचे हे भाषण ऐकून सुंदर शय्येवर निजलेली ती मनात भीष्माचे व इतर कुरुवीरांचे चिंतन करू लागली."

 (पहिल्याने सर्व राजांसमक्ष आपल्याला हिरावून नेणा-या भीष्माची
४० / परिपूर्ती
 

वीरमूर्ती तिच्या डोळ्यांपुढे आली. विचित्रवीर्यासारख्या रोगी नाजूक पुरुषाशी लग्न लागले त्या वेळचा मनोभंग. मनातील सुप्त आशा व आता ती पूर्ण होईल का? अशी सोत्कंठ हुरहूर.... नंतर लगेच त्याची ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा तिला आठवली असावी- छे:! तो कसचा येतो? - मग कोण बर? म्हणून कौरवांच्या दरबारातील इतर वीरकौरवांच्या मूर्ती ती आठवते.)
 "ततो अम्बिकायां प्रथमं नियुक्तः सत्यवाग ऋषिः।।
 दीप्यमानेषु दीपेषु शयनं प्रविवेश ह।।”
 “नंतर अंबिकेसाठी योजलेला सत्यवाक ऋषी दिव्यांनी उजळलेल्या त्या शय्यागृहात आला."
 (शय्यागारात व अंबिकेच्या सोत्कंठ हृदयांत आशेचे दीप पाजळले होते.)
 "तस्य कृष्णस्य कपिला जटा दीप्ते च लोचने।
 ब्रभ्रूणि चैव श्मश्रूणि ष्टवा देवी न्यमीलयत।।"
 "त्या काळ्या पुरुषाच्या तांबड्या जटा, अंगारासारखे डोळे व पिगट मिशा पाहून देवी अंधारली."
 (न्यमीलयत= निमिमील। (कालिदासः रघुवंश; आठवा सो "निमिमील नरोत्तमप्रिया हृच्चन्द्रा तमसेव कौमुदी।" “चन्द्र गेल्याने का जशी अंधारात विलीन होते तशी चैतन्याने स्फुरणारी राणी काळोखला मेली.") अंबिकेचे शय्यागृह व हृदय तसेच आशेने पाजळले होते- ld शरीर राहिले, पण हृदयाचे- आशेचे- कोळसे झाले.)
 आणि अजून माझे मन त्या अभागी जीवाच्या या भयंकर विटबनेने बधिर होते. ही बीजक्षेत्रन्यायाची विटंबना आहे, ‘दीर' शब्दाची विटंबना आहे, ही एका कोळ्याच्या पोरीने क्षत्रिय कुळाची केलेली विटंबना आहे, की-की भीष्माने आपल्या महत्त्वाकांक्षी, शीलभ्रष्ट सावत्र आईवर उगवलेला भयंकर सूड आहे?