Jump to content

देव्यपराधक्षमापनस्तोत्रम्

विकिस्रोत कडून

<poem> न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथा: | न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम् ||१|| -अर्थः मला ना मंत्र माहिती ना कुठलं यंत्र माहिती. तुझी स्तुती कशी करू हेही मी जाणत नाही. पूजाविधीमध्ये असलेले आवाहन, ध्यान इत्यादी, किंवा ध्यान(योग)मार्गात असलेल्या अनेक मुद्रा वगैरेही मी जाणत नाही. मी फक्त एकच जाणतो, तुझं अनुसरण करणं, जे की सगळे क्लेश दूर करणारं आहे.

विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया विधेयाशक्यत्वात्तवचरणयोर्या च्युतिरभूत् | तदेतत्क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||२||

-अर्थः माझ्याकडे पूजनाच्या विधींबद्दलचं ज्ञान नाही, पूजा करावी म्हटलं तर पुरेसं द्रव्य(पैसा) नाही, आणि तोही असला तरी मूलतः असलेला आळस या अशा गोष्टींमुळे मी तुझ्या चरणांपासून दूर झालो. पण हे सकलोद्धारिणि, शिवे, माते, माझे हे अपराध पोटात घाल. कारण एक वेळ कुपुत्र जन्माला येईल, पण माता कधीही कुमाता नसते.

पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरला: परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः | मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||३||

-अर्थः या भूतलावर तुझे अनेक सरलमार्गी पुत्र असतील/आहेत, पण त्यांच्या मध्ये मीच असा तरल स्वभावाचा असा तुझा पुत्र आहे. माझा असा त्याग करणं तुला शोभत नाही, कारण एक वेळ कुपुत्र जन्माला येईल, पण माता कधीच कुमाता नसते.

जगन्मातर्मातस्तवचरणसेवा न रचिता न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया | तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||४||

-अर्थः हे जगन्माउली, मी तुझ्या चरणांची सेवा कधी केली नाही किंवा मी तुझ्यासाठी म्हणून कधी द्रव्य वेचलं नाही. तरिसुद्धा तू तुझं निरुपम प्रेम माझ्यावर ठेवलंस. म्हणतात ना, एक वेळ कुपुत्र जन्माला येऊ शकेल, पण माता कधीच कुमाता नसते.

परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि | इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम् ||५||

-अर्थः वयाची पंच्याऐशीहून अधिक वर्षे सरली, मी इतर सगळ्या देवांचा आणि विविधप्रकारच्या सेवांचा (देवाच्या सेवांचा, उपासना इ.चा) त्याग केला- का? तर मला तुझी कृपा हवी आहे म्हणून. आणि आता जर तुझी कृपा झाली नाही, तर हे लंबोदरजननी, मी निरालंब(निराधार) असा आता कुणाला शरण जाऊ?

श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकै: | तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं जनः को जानीते जननि जपनीयं जपविधौ ||६||

- अर्थः (या श्लोकाचा अर्थ नीट शोधला पाहिजे) पण वरवरचा अर्थ- तुझ्या नामाचे वर्ण (नावात येणारी अक्षरे) कानात नुसती शिरली तरीही, वायफळ बडबड करणार्‍याची वाणि मधुपाकासमान गोड होते आणि जो रंक आहे तो चिरकाळ कोटिसुवर्ण(मुद्रा) भोगू लागतो. हे केवळ तुझ्या नामजपाचे फल. पण तुझ्या अशा या जप करण्यास योग्य अशा जपविधीचा महिमा कोण जाणतो? (कुणीच नाही)

चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपति: | कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटी फलमिदम् ||७||

अर्थ- फार सुंदर अर्थ आहे. शंकराचं वर्णन केलंय- शंकर चिताभस्म लावतात, वैराग्यास योग्य असं अन्न सेवन करतात, दिगंबर राहतात, जटा वाढवलेल्या आहेत, गळ्यात भुजंगरूपी हार धारण करतात, पशुपती आहेत, भूतांचे नाथ आहेत- असे असूनसुद्धा त्यांना सगळे जगदीश म्हणतात. हे, त्यांनी तुझ्याशी विवाह केला याचंच तर फळ आहे.

न मोक्षस्याकांक्षा भवविभववाञ्छापि च न मे न विज्ञानापेक्षा शशिमुखिसुखेच्छापि न पुनः | अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै मृडाणी रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः ||८||

-अर्थ: थोडंसं उलट्या क्रमानं आलंय खरं, पण- मला मोक्षाची इच्छा नाही, या संसारात वैभव मिळावे अशी इच्छा नाही, मला विशेष ज्ञान मिळावं अशी अपेक्षा नाही की चंद्रमुखी स्त्रीचं सुख मिळावं अशीही इच्छा नाही. म्हणून, हे जननि, माझं तुझ्याकडे एकच मागणं आहे, की माझा संपूर्ण जन्म, तुझ्या आणि शिवाच्या नामस्मरणात जावो.

नाराधितासि विधिना विविधोपचारै: किं रुक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभि: | श्यामे त्वमेव यदि किञ्चन मय्यनाथे धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव ||९||

-अर्थः - मी तुझी विधिवत उपचारांनी किंवा रुक्षचिंतनपर वचनांनीही आराधना केली नाही . श्यामे(कालिकामाता) तूच मज अनाथावर तुला उचित वाटेल ती कृपा कर.

आपत्सु मग्न: स्मरणं त्वदीयं करोमि दुर्गे करुणार्णवेशि नैतच्छठत्वं मम भावयेथा: क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ती ||१०||

जगदम्ब, विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि | अपराधपरम्परापरं न हि माता समुपेक्षते सुतम् ||११|| मत्समः पात़की नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि एवं ज्ञात्वा महादेवि यथायोग्यं तथा कुरु ||१२||

अर्थ- हे करुणासागर दुर्गे, आपत्तींमध्ये मी तुझंच स्मरण करतो. यात कुठलीही लबाडी नाही (केवळ आपत्ती असली की मला तुझी आठवण येते असं नाही) पण तहान-भुकेने व्याकूळ झालेल्या लेकराला जशी आईच आठवते, तद्वत मी तुझं आपत्तींमध्ये स्मरण करतो. आणि हे जगदंबे, माझ्यावर तुझी परिपूर्ण अशी करुणा/कृपा आहे यात नवल ते काय? कारण मुलाने कितीही अपराध केले तरीही आई त्याची उपेक्षा कधीच करत नाही. हे देवी, माझ्यासारखा पातकी या जगात दुसरा कुणीही नाही. पण हे जितकं खरं आहे तितकंच हेही खरंच आहे की तुझ्यासारखी पापांचा नाश करणारी दुसरी कुणीही नाही, त्यामुळे हे माझे भाव जाणून तुला माझ्याबाबतीत जे योग्य वाटेल ते तू कर.

||इति श्रीमत्परमहंस-परिव्राजकाचार्य श्रीशंकराचार्यविरचितं देव्यापराधक्षमापनस्तोत्रं सम्पूर्णं ||

देव्यपराधक्षमापनस्तोत्रम् ( अनुवाद पर्याय २)

[संपादन]

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.