दत्ताची आरती/ दत्त दिगंबर त्रिमूर्ति सुंदर अनुसूयासुत तुज म्हणती

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem>

दत्त दिगंबर त्रिमूर्ति सुंदर अनुसूयासुत तुज म्हणती । आरती ओवाळिता तरले असंख्य जन हे मूढमति ॥ धृ. ॥

जग ताराया हरि हर ब्रह्मा त्रिमूर्तिरूपे अवतरती । दंडकमंडलु हस्ती धरुनी काषायांबर पांघरती ॥ १ ॥

कुष्ठी ब्राह्मण शुद्ध करूनी वंध्ये पुत्र देताती ॥ मृत ब्राह्मणही उठविसि तीर्थे काष्ठीं पल्लव फुटताती ॥ २ ॥

दत्त दत्त हे नाम स्मरतां पिशाच्च भूतें झणिं पळती । गाणगाभुवनी गुप्त राहुनियां अघटित लीला दाखविती ॥ ३ ॥

महिमा काय वर्णू किती मी भक्तवत्सला तुला म्हणती । मोरेश्वरसुत वासुदेव या अखंड भजना देई प्रीति ॥ ४ ॥ <poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg