गणपतीची आरती/उंदरावरि बैसोनि दूडदूडा
Jump to navigation
Jump to search
<poem> उंदरावरि बैसोनि दूडदूडा येसी। हाती मोद्क लाडू घेउनियां खासी। भक्तांचे संकटी धावूनि पावसी। दास विनविती तुझियां चरणासी जय देव जय देव जय गणराजा॥१॥
जय देव जय देव जय गणराजा सकळ देवां आधी तूं देव माझा॥ जय देव.॥धृ.॥
भाद्रपदमासी होसी तू भोळा। आरक्त पुष्पांच्या घालूनिया माळा। कपाळी लावूनी कस्तुरी टीळा। तेणे तू दिससी सुंदर सांवळा॥ जय देव जय देव जय गणराजा॥२॥
प्रदोषाचे दिवशी चंद्र श्रापीला। समयी देवे मोठा आकांत केला। इंदु येवोनि चरणी लागला। श्रीराम बहुत श्राप दिधला॥ जय देव जय देव जय गणराजा ॥३॥
पार्वतीच्या सुता तू ये गणनाथा। नेत्र शिणले तुझी वाट पाहतां॥ किती अंत पाहासी बा विघ्नहर्ता। मला बुद्धी देई तू गणनाथा॥ जय देव जय देव जय गणराजा ॥४॥
<poem>
![]() |
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. | ![]() |