Jump to content

कोकिलाबाई गोडबोले (नाट्यछटा)

विकिस्रोत कडून

<poem> .... मेले हात धुऊन पाठीस लागले आहेत जसे ! काडीइतकें सुद्धां कार्ट्यापासून सुख नाहीं ! - कस्सें, करुं तरी कसें आतां ! जेवा मुकाट्यानें ! नाहीं तर चांगली फुंकणी घालीन पाठीत एकेकाच्या ! - काय, काय म्हटलेंस गण्या ? - मेल्या ! मी मोठमोठ्यांनें ओरडते का ? - ऊं ! - चूप ! ओक्साबोक्शी रडतो आहे मेला ! जीव गेला ? का घालूं आणखी पाठींत ? - काग वेणे ? गप कां बसलीस ? - भाकरीवर तूप हवें ? - मेलें माझें तोंड नाही धड आतां ! बापानें ठेवलें आहे तूप तुझ्या टवळे ! तूप पाहिजे नाहीं ? हें घे ! - गप्प ! नाहीं तर आणखी रपके घालीन चांगले ! - मिटलें का नाही तोंड ? का अस्सा आणखी ! - हात तुला घातले चुलींत नेऊन अवदसे ! - कोण आहे ? कोण हांका मारते आहे बाहेर ? - आहेत हो, आहेत ! आलें, आलें ! - या पोरट्यांच्या गागण्यानें अमळ ऐकूं येईल तर ना ? लग्न होऊन घरांत आल्यापासून सारखी पाहत आहें, रात्रंदिवस मेला जंजाळ पाठीमागे ! - सांडलेंस पाणी ? - बाई ! बाई ! भंडावून सोडलें आहे या पोरट्यांनी - ! पहा, आहे ? नीट मुकाट्यानें जेवायचें, त्या मिटक्या रे कशाला वाजवायच्या ? - थांब !! हा झारा तापवून चांगला चरचरुन डाग देतें तोंडाला ! - दळिद्री कारटी ! खाऊन पिऊन मेली झालीं आहेत पहा कशीं ! मरुं घातली आहेत जशीं ! - आलांत ? आज लवकर येणें केलें ? स्वारीचें भटकणें लवकरच संपलें म्हणायचें ! रोज उठून तीं मेलीं मंडळें का फंडळे ! कर्माची करा आपल्या मंडळें ! - उद्यां जा तर खरे, कीं ही सगळी कारटी आणून तिथें उभी करते अन् पहाते तमाशा ! - आलें हो, आलें ! - केव्हांच्या त्या मुरलीबाई हांका मारीत आहेत, तेव्हां अमळ - ऐकलें का ?

- असें घुम्यासारखें बसायचें नाहीं !

संभाळा या कारट्यांना, नाहीं तर मेली आग लावून देतील घरादाराला ! - आलें बाई !!....


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.