अहो कुंभारदादा ! (नाट्यछटा)

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> ' कां रडतों ! ' रावसाहेब, मी आपल्या जन्माकरतां रडतों आहें ! हीच ती जागा ! आणखी, याच दिवशीं सकाळीं - नुकतें अकरावें वर्ष लागलें होतें मला - कोंवळ्या उन्हामध्यें, वार्‍यानें भुरभुर उडणार्‍या या भट्टीतल्या विस्तवाच्या कुरळ केसांवर हात फिरवीत, मोठ्या मजेमध्यें बसलों होतों मी ! इतक्यांत दोन गोळ्या माझ्या पाठींत शिरल्या ! बाबा अन आई रडायला लागलीं ! पण मी मात्र येथें, मृत्युलोक व परलोक यांच्यामध्यें झोके घेत खुशाल निजलों होतों ! पुढें, अंधारांत वाट चुकलेल्या कालाचा चुकून माझ्या जखमेवर हात पडला मात्र, तोंच सगळ्याच शिरा झणाणून ' नको ! ' म्हणून ओरडल्या ! डोळे उघडून जों पाहतों तोंच, एक मोठी थोरली बंदूक घेतलेला धिप्पाड पुरुष - त्याच्या अंगाभोंवतीं किती तरी लहानमोठे तारे इकडून तिकडे फिरत होते ! - माझ्या हदयावरुन आपला हात उचलतांना दृष्टीस पडला ! - व हंसत हंसत तो काय म्हणाला, ' नको ! तर राहिलें ! असाच रडत बैस, पुनः मात्र मी लवकर येणार नाहीं ! ' - पुढें काय ? अंधार ! रावसाहेब, या गोष्टीला आज पन्नास वर्षे झाली. आई मेली, बाप मेला ! पण मी मात्र दुर्दैवामध्यें तडफडत आहें ! मधून मधून काय सुखाचे झुळझुळ वारे वाहतील तेवढेच ! - ऐका, सातांचे ठोके पडत आहेत. रावसाहेब, हा शहराच्या मध्यावर असलेला घड्याळाचा उंच मनोरा या माझ्या भट्टींतून तयार झालेल्या विटांनीं बांधलेला आहे ! हा मनोराच काय, पण गांवांत दिसणार्‍या मोठमोठ्या इमारतींनाही मींच विटा पुरविल्या आहेत ! - हा मनोरा बांधल्याला जवळजवळ आठ वर्षे झालीं; पण आकाशांत मोठमोठ्या वावटळी सुटून जरी सारखा धो धो पाऊस पडत होता, वर आणखी विजाही कडकडत होत्या, तरी हा आपला छाती काढून त्यांच्याकडे टक लावून पाहत उभाच ! कितीही कडक ऊन पडो, पण एक वेळसुद्धां यानें हुश्श म्हणून केलें नाहीं ! माझ्या हातच्या विटांचा मनोरा हा ! - नरकामध्यें माझ्या पापकर्माची मनोरा उभारलेला आहे ! नाहीं असें नाहीं ! - पण हाय ! माझीं ही व्यसनी मुलें व त्यांचे फाजील लाड करणारी माझी बायको, या प्राण्यांच्या दुर्दैवाला मदतीला घेऊन सर्व जण, रोज सकाळपासून रात्री दिसेनासें होईपर्यत मी रावून तयार केलेला - या हदयांतील प्रचंड असा आशेचा मनोरा रोजच्या रोज भांडणांची वादळे उत्पन्न करुन ढासळून कीं हो टाकतात ! काय सांगूं ! रात्रीं झोपेकरतां डोकें टेकायचा अवकाश, की ' नको ! नको ! म्हणून भेसूर गळा काढून माझी उशी रडायला कीं हो लागते ! - अरे पांडुरंगा ! हाय रे पांडुरंगा !! ....


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg
Question Copyright 2.png
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.