अन्वयार्थ - १

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to searchअन्वयार्थ-१शरद जोशी
प्रकाशकाचे मनोगत


 रद जोशी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने त्यांचे सर्व लिखाण ग्रंथरूपात येत आहे. या उपक्रमातील 'अन्वयार्थ' हे एक पुढचे पाऊल. हे लेख 'दै. लोकमत'मध्ये इ.स. १९९२ - १९९४ व इ.स. २००० - २००१ या कालावधीत 'अन्वयार्थ' सदराखाली प्रसिद्ध झालेले आहेत. लेखांखाली तारखा आवर्जून टाकल्या आहेत, जेणेकरून काळाचा संदर्भ आवश्यक तेथे स्पष्ट व्हावा. शेतकरी संघटनेचा विचार हा फक्त शेतकऱ्यांपुरता मर्यादित नसून तो सर्वांचाच आहे. हे वेगळं सांगायची गरज नाही. इतके हे लिखाण स्पष्ट आहे.
 कै. हेमंत देशमुख, सौ. शैला देशपांडे, सुरेशचंद्र म्हात्रे, दै. लोकमत औरंगाबादचे वृत्तसंपादक चक्रधर दळवी या सर्वांमुळे हे लेख उपलब्ध झाले. त्यांचे मनःपूर्वक आभार.
 'शेतकरी संघटक' या पाक्षिकातील शरद जोशी यांचे लेख 'माझ्या शेतकरी भावांनो- मायबहिणींनो', 'बळिचे राज्य येणार आहे', 'भारता'साठी', 'पोशिंद्यांची लोकशाही', 'चांदवडची शिदोरी' या शीर्षकाखाली प्रकाशित करीत आहोत. ही सर्व पुस्तके अमृत महोत्सवी वर्षात प्रकाशित करण्याचा आमचा मानस आहे.
 'अंगारमळा' या पुस्तकाला नुकतेच महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन गौरविले आहे. शरद जोशी यांच्या लिखाणाची अभ्यासक, विचारवंत योग्य ती दखल घेतील ही आशा आम्ही बाळगतो.

१६ मार्च २०१०

श्रीकांत उमरीकर

 

गुढीपाडवा