अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ स्वयंव्यवस्थापनाची शैली

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf
यंव्यवस्थापनातील शेवटची दोन महत्त्वाची तत्त्वं म्हणजे आपलं योगदानमूल्य ओळखणंं आणि समूहाचा भाग म्हणून काम करण्याची तयारी ही आहेत.‍‌‌‍'थेंंबे थेंंबे तळे साचे' ही म्हण आपल्या परिचयाची आहे. एखाद्या कार्यात प्रत्येकानं आपल्या कुवतीप्रमाणं आणि आपल्यावरील जबाबदारीनुसार योगदान केल्यानं ते काम झटपट आणि सुबक पध्दतीनं होतं, तसेच त्यापासून फलनिष्पत्तीही अपेक्षेप्रमाणंं, काही वेेळा अपेक्षेपेक्षाही अधिक होते. त्यामुळे आपलंं योगदान कोणतं, किती आणि कसं असावं हा प्रश्न प्रत्येकानंं स्वत:ला विचारला पाहिजे. मात्र प्रत्यक्षात बहुतेक जण या प्रश्नांचा सखोल विचार करीतच नाहीत. केवळ सांगितलं म्हणून केलं, असं सांंगकाम्यासारखं काम करण्याची बहुतेकांची पध्दत असते.

 कित्येकदा वरिष्ठांनाही असंच काम करणारे कर्मचारी हवे असतात. प्रत्येकानं सांगितलेलं काम सांगितलेल्या पध्दतीनंं केलं की ते आपोआप होतं अशी त्यांची समजूत असते. ती चुकीची आहे असं नाही. ते समजून-उमजून करावं याला व्यवस्थापनानं महत्त्वं दिल्यास ते अधिक फायद्याचं ठरतंं.
 सध्या शारीरिक श्रमांच्या कामापेक्षा बौध्दिक कामाचं महत्त्वं वाढलं आहे. असं काम करणाच्या कर्मचाऱ्यांना ज्ञानप्रधान कर्मचारी (नॉलेज वर्कर्स) अशी संज्ञा आहे. अशी बौध्दिक कामंं करणाऱ्यांनी 'माझं योगदान कोणतं असावं’ हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे.
 या प्रश्नाचं उत्तर तीन बाबींवर अवलंबून आहे. एका परिस्थितीची गरज कोणती आहे, दोन आपली शक्तिस्थानं, आपली कार्यपध्दती आणि आपले आदर्श यांचा मेळ घालून जास्तीत जास्त योगदान मी कसं करू शकेन आणि तीन, काम परिपूर्ण होण्यासाठी माझ्या योगदानातून कोणती फलनिष्पत्ती अपेक्षित आहे? या तीन प्रश्नांच्या उत्तरातून आपल्या योगदानाचं मूल्य किती याची नेमकी माहिती मिळू शकते आणि योगदानात प्रगती साधता येते.
 केवळ सर्वांनी मिळून एखादं काम करणंं म्हणजे योगदान असा अर्थ होत नाही.
योगदानातून कामाला निश्चित दिशा मिळाली पाहिजे. म्हणजेच ते वर दिलेल्या 'थेंबे थेंबे तळे साचे ' या म्हणीप्रमाणे झालं पाहिजे. 'हत्ती आणि सात आंधळे' या कथेप्रमाणे होता कामा नये. सात आंधळे एका हत्तीची तपासणी करावयास सुरुवात करतात. ज्याच्या हाती हत्तीचा पाय लागतो, त्याला वाटतं हती खांबाप्रमाणे आहे. ज्याच्या ज्याची सोंड लागते त्याला वाटतं हत्ती नळीप्रमाणं आहे. शेवटी हत्ती नेमका कसा आहे हे कळून येतंच नाही. योगदान अशाच प्रकारचे असू नये. (याचंच आणखी एक उदाहरण म्हणजे सध्या निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यानंतर प्रत्येक वृत्तवाहिनीवरून जाहीर होणारे एक्झिट पोलचे निकाल!) तेव्हा, अर्थपूर्ण योगदान करण्याची सवय लावून घेणं हे स्वयंव्यवस्थापनाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि ही सवय लावण्यासाठी आपलं योगदानमूल्य समजून घेणं आवश्यक आहे.
समूहाचा भाग म्ह्णून काम करत असल्याची जाणीव
 थोर कलाकार, शास्त्रज्ञ अशा मोजक्या व्यक्ती पूर्णपणे स्वतःच्या जोरावर काम करून अपेक्षित परिणाम मिळवून दाखवितात. त्यांचा अपवाद वगळल्यास इतर सर्वसामान्यांना कोणतंही काम ते करणाऱ्या समूहाचा एक भाग म्हणून करावं लागतं, हे काम करणाऱ्या प्रत्येकाचे एकमेकांशी विशिष्ट प्रकारचे संबंध असतात. ते त्या कामातूनच निर्माण झालेले असतात.
 हे संबंध जपण्याची प्रत्येकाची जबाबदारी असते. या जबाबदारीची जाणीव हे स्वयंव्यवस्थापनातील महत्त्वाचं तत्त्व आहे. ही जाणीव निर्माण होण्यासाठी दोन बाबी लक्षात ठेवावयास हव्यात.
 एक, आपल्याबरोबर काम करणारे इतरसुध्दा माणसंच आहेत. त्यांनाही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यापैकी प्रत्येकाची स्वतःची शक्तिस्थानं आहेत, काम करण्याची स्वतंत्र पध्दत आहे आणि नीतिमूल्यं आहेत. त्यामुळं काम करणाच्या प्रत्येकाला इतरांची शक्तिस्थानं, कार्यपध्दती आणि नीतिमूल्यं यांची माहिती असणं आवश्यक आहे.
 उदाहरणार्थ,एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सचिवानं दिलेले लेखी अहवाल वाचून निर्णय घेण्याची सवय होती. त्यामुळं त्याचा सचिव प्रत्येक लहानसहान बाबत लेखी अहवाल स्वरूपात बॉससमोर ठेवत असे. काही वर्षांनंतर या बॉसच्या जागी नवीन आला. त्याला वाचनाचा कंटाळा होता. त्याऐवजी ऐकून माहिती घेणं त्याला पसंत होतं. पण सचिवानं सर्व काही लेखी देण्याची सवय सोडली नाही. त्यामुळे बॉसनं कंटाळून सचिवावर 'अकार्यक्षम’ असा शिक्का मारला. नव्या बॉसची कामाची पध्दत सचिवानं प्रथम नीट अभ्यासली असती तर त्याच्यावर असा अपमान करून घेण्याची वेळ आली नसती. कामाच्या बाबतीत सचिव अकार्यक्षम.नव्हता. पण नव्या वरिष्ठाची काम करण्याची पध्दत लक्षात घेण्यात तो अकार्यक्षम ठरला.त्यामुळे त्याचं कामंही निरर्थक ठरलं. यावरून संबंध जपण्याबाबतची जाणीव म्हणजे काय हे आपल्या लक्षात येईल.आपल्या सहकाच्यांबाबतही असंच असतं. ते तुमच्या पध्दतीनं नव्हे, तर त्यांच्या पध्दतीनं कार्य करतात आणि प्रत्येकाची क्षमता भिन्न असते. त्यांच्याशी जुळवून घेताना या सर्व बाबी ध्यानात घ्याव्या लागतात.
संपर्काची जबाबदारी :
 एकच काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये पुरेसा संपर्क असणंं आवश्यक आहे. संपर्क नसल्यामुळंं गैरसमज निर्माण होतात. आपण काय करीत आहोत, सहकाच्याचं काय चाललं आहे याचा ताळमेळ संपर्क असल्याशिवाय साधता येत नाही.
 पूर्वीप्रमाणे सध्या कोणतीही संस्था केवळ नियम व शिस्त यांच्यावर चालू शकत नाही. नव्या युगातील संस्था परस्पर विश्वासावर चालते. संपर्क सुयोग्य असेल तरच विश्वासाचंं वातावरण निर्माण होतंं. त्यामुळंं समूहनं कार्य करणाच्या प्रत्येकानं सहकाऱ्यांंशी संपर्क प्रस्थापित करण्याची जबाबदारी स्वीकारणंं आवश्यक आहे, ही शिस्त लावून घेणंं हा स्वयंव्यवस्थापनाचाच एक भाग आहे.