अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापन संघर्षाचे
असतात. मात्र, अनेक व्यवस्थापकांचा कल अधिकार गाजविण्याकडं अधिक असतो. त्यामुळं सेवा देणं आणि सेवा घेणं यातील ताळमेळ व समतोल बिघडतो. याचा संस्थेवर विपरीत परिणाम होतो. व्यवस्थापकानं हे टाळलं पाहिजे. एकाधिकारशाहीविषयी असंच आहे.
संवाद कौशल्याचा अभाव : व्यवस्थापकाला आपल्यापेक्षा कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोघांशीही सुसंवाद साधता येणं आवश्यक आहे. काही व्यवस्थापकाचं पेपरवर्क उत्तम असतं, पण ते संवाद साधण्याच्या कलेत मागे पडतात. त्यामुळं त्यांच्या व्यवस्थापकीय कामगिरीत त्रुटी राहते. कनिष्ठांकडून सेवा घेताना त्यांच्याशी सुसंवाद आणि वरिष्ठांना सेवा देताना त्यांच्याशी सुसंवाद अशी कसरत मधल्या पातळीवर काम करणाऱ्या व्यवस्थापकाला करावी लागते. संवादकौशल्य नसल्यास असं करणं अवघड होतं. या स्थितीत त्वरित बदल होणं शक्य नसतं. मात्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीनं निश्चित पावलं उचलणं आवश्यक असतं. कर्मचारी व व्यवस्थापकांना प्रशिक्षित करणं हा महत्त्वाचा उपाय आहे. शास्त्रशुध्द प्रशिक्षणामुळं पारंपरिक मानसिकतेत बदल घडू शकतो. सेवा उद्योग हा इतर उद्योगापेक्षा वेगळा आहे. इथं उत्पादन हे महत्त्वाचं नसून माणूस आणि त्याच्या गरजा हेच महत्त्वाचं आहे. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाशी आणि संबंधितांशी व्यवहार करताना त्याचं समाधान हे व्यवस्थापकाचं आणि कर्मचाऱ्यांचं ध्येय असलं पाहिजे अशी मानसिक घडण बनविल्यास हा बदल घडू शकतो.
सांघिक कार्य :
एकट्याने काम करण्यापेक्षा एखाद्या समूहाचा सदस्य म्हणून कार्य केल्याचे अनेक फायदे होत असतात. एकाच संस्थेत कार्य करणाऱ्यांमध्ये परस्पर हेवेदावे, व्यक्तिगत स्पर्धा, मत्सर आणि द्वेष शक्यतो न राहतील याची खबरदारी व्यवस्थापनाला घ्यावी लागते. एकमेकांना आपुलकीने वागविणारे व्यवस्थापक व कर्मचारीच ग्राहकांना आपुलकीने सेवा देऊ शकतात. म्हणनच समूह संस्कृती रुजविण्यासाठी संस्थेने खास प्रयत्न केले पाहिजे.
स्वयंव्यवस्थापन : डॉ. रेड्डीन या विख्यात व्यवस्थापन तज्ज्ञानं म्हटलं आहे, 'व्यवस्थापन
म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मानव- व्यवस्थापन आहे आणि मानव - व्यवस्थापन म्हणजे आणखी काही नसून स्वयंव्यवस्थापन आहे.' थोडक्यात व्यवस्थापक या नात्यानं आपली संस्था आणि संस्थेचे ग्राहक यांना अव्वल दर्जाची सेवा प्रदान करावयाची असेल, तर व्यवस्थापकाने स्वतःचं व्यवस्थापन उत्कृष्ट केलं पाहिजे. स्वतःतील दोष मनोनिग्रहाने दूर केले पाहिजेत आणि स्वतःचे गुण प्रयत्नपूर्वक जोपासले पाहिजेत.
☐
सीमाविरहीत जगातील व्यवस्थापन (भाग पहिला)
माणसाला भिंती उभारून स्वतःची सीमारेषा ठरविण्याची सवय असते. यापैकी काही भिंती नैसर्गिक असतात. नद्या, पर्वतरांगा, समुद्र वगैरे. तर काही भिंती या मुद्दाम बांधल्या जातात. उदाहरणार्थ, बर्लिनची भिंत, चीनची अजस्त्र भिंत इत्यादी. या भिंती उभ्या करण्याच्या सवयींतूनच भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळी राष्ट्र निर्माण झाली.
या भिंतींप्रमाणेच माणसाच्या मनातही काही भिंती उभ्या असतात. 'युध्द ही रणभूमीवर नव्हे तर माणसांच्या मनात सुरू होतात. त्यामुळे शांतीचे बालेकिल्लेसुध्दा माणसांच्या मनातच निर्माण झाले पाहिजेत.' असं युनेस्कोच्या प्रिअँँबलमध्ये म्हटलं आहे. या मनातील भिंतीमुळं युध्द आणि सीमाविवाद निर्माण होतात.
अन्नाच्या तुटवड्यामुळे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असल्याने पूर्वीच्या काळी अशा संरक्षक भिंतीची आवश्यकता भासत होती, पण तो काळ आता बराच मागं पडला आहे. आधुनिक तंत्रज्ञानानं अन्न व इतर अनेक आवश्यक वस्तूंचा तुटवडा आटोक्यात आणला आहे. अनेक विकसित देशांमध्ये तर कुपोषणामुळे नव्हे तर नको तक खाण्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. अन्य देशांमध्ये दुष्काळ, वादळ, महापूर नैसर्गिक संकटे उदभवल्यास तेथे धान्य पुरवठा करण्याइतकी कित्येक राष्ट्र सबळ आहेत. मालवाहतूक क्षेत्रातही क्रांती झाल्यानं असा पुरवठा त्वरित करता येतो. तरीही जगात भूकबळी पडण्याची उदाहरणं नित्य घडतात. ती अन्नाचा तुटवडा आहे म्हणून नव्हे, तर त्याचं वाटप अयोग्य पध्दतीनं होतं म्हणून. मग प्रश्न असा की, अशा समृध्द जगात आज सीमारेषा आणि जमिनीचे तुकडे पाडणाऱ्या भिंती यांची खरोखरच आवश्यकता एक म्हण आहे. तिचा उपयोग विवाद मिटविण्यासाठी करणं आवश्यक आहे. म्हणजेच व्यवस्थापकीय कामकाज कसं चालतं, अडचणी कोणत्या असतात आणि अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी कोणत्या कसरती कराव्या लागतात याची माहिती कर्मचाऱ्यांना करून देणं गरजेचं आहे. तसंच कर्मचाऱ्यांच्या समस्यांची व्यवस्थापनाला प्रत्यक्ष ओळख होणं महत्वाचं आहे. थोडक्यात कर्मचाऱ्यांना व्यवस्थापकांच्या आणि व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांच्या 'वंशा'ला पाठविणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी संस्थेची सत्य परिस्थिती त्यांना समजावून सांगणं आवश्यक आहे. मात्र, ती सांगताना लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या गोष्टींप्रमाणं सांगावयास हवी. सत्य तर समजलं पाहिजे, मात्र त्याचा सकारात्मक परिणाम झाला पाहिजे. नकारात्मक भावना निर्माण होता कामा नये. तशी झाल्यास व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य खचू शकतं.
सत्य समजल्याने गैरसमज दूर होतात. एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती वाढीस लागते. संस्था हेच आपलं जीवन आहे. ती टिकली पाहिजे. वाढली पाहिजे, हे ध्येय दोन्ही बाजूंमध्ये निर्माण झालं पाहिजे. कंपनीच्या मूल्यवृध्दीमध्ये व्यवस्थापनाचं योगदान किती, कर्मचाऱ्यांचं किती याची दोन्ही बाजूंना माहिती मिळाली की, कुणाच्या कोणत्या मागण्या न्याय्य आहेत आणि नाहीत याचा निर्णय सामोपचारानं घेणं अशक्य नाही. सध्याच्या स्पर्धेच्या युगात या सामंजस्याची आवश्यकता कधी नव्हे इतकी निर्माण झाली आहे. संस्थेच्या अंतर्गत कामकाजापासून ते तयार होणाऱ्या उत्पादनांपर्यंत सर्वांची गुणवत्ता या सामंजस्यावर अवलंबून आहे. यात कुठेही कमी पडल्यास शर्यतीत मागं पडण्याची भीती असते.
हा सुसंवाद प्रशिक्षण आणि कार्यशाळांमधून निर्माण होतो. मात्र हे एका दिवसात साध्य होत नाही. किर्लोस्कर कमिन्समध्ये सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यास तीन वर्षे लागली. अर्थात ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. मात्र ती नेटानं सुरू ठेवणं जरुरीचं आहे हे लक्षात घ्यावयास हवं.