Jump to content

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/मनुष्यबळ व्यवस्थापन आणि सत्ता

विकिस्रोत कडून

नुष्यबळ व्यवस्थापनाची तीन प्रमुख सूत्रं आपण. मागच्या लेखात पाहिली. कोणत्याही व्यवस्थापनासाठी व्यवस्थापकाकडे सत्ता असण आवश्यक आहे. मात्र सत्ता हे दुधारी शस्त्र आहे.तिचा उपयोग सकारात्मक केल्यासच तो संस्था, व्यवस्थापन व कर्मचारी यांना फायद्याचा ठरू शकतो. सत्तेचा वापर करतानां व्यवस्थापकाला पुढील तीन बाबींचा मोह होऊ शकतो.

 १. अधिकारांच्या गैरवापराचा मोह
 २. खुशमस्करीचा मोह
 ३. गटबाजीचा मोह
अधिकाराचा गैरवापर:
 अधिकार हातात आला की, तो टिकविण्यासाठी त्याचा गैरवापर करण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते.याचा फटका कनिष्ठ कर्मचाच्यांना बसतो. या भैरवापराला उघड विरोध करण्याचं धाडस कनिष्ठांनी दाखविलं नाही, तरी अशा व्यवस्थापकाला ते मनापासून सहकार्य करीत नाहीत. आपल्या अधिकारातील विभागाची सर्व कामं व्यवस्थापक स्वत: करू शकत नाहीत.त्याला कनिष्ठ कर्मचाच्यांवर अवलंबून राहावं लागतंच त्यांनी केवळ ‘सांगितलेले काम करणे’ हे ध्येय ठेवल्यास व्यवस्थापकाचीच अडचण होते त्यामुळे आपल्या अधिकारांत कानिष्ठांंनाही वाटेकरी करून घेणे हा अधिकारांचा वापर करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे.यामुळे आपोआपच जबाबदाऱ्यांंचेही विकेंद्रीकरण होतं आणि व्यवस्थापकाचे काम सोपे होते. आपला व्यवस्थापक हुकुमशहा ' नाही ही भावना निर्माण झाली की कनिष्ठ कर्मचारीही स्वतःच्या पुढाकाराने अनेक कामं बिनबोभाट करतात .स्वतःच्या अडचणी न घाबरतो मांडू शकतात. मोकळ्या वातावरणामळे विभागाची कामगिरी अधिक सुधरते असा अनुभव आहे. मात्र, अधिकाराचं विकेंद्रीकरण कसं आणि किती प्रमाणात करावं .हे व्यवस्थापकाच्या कौशल्यावर अवलंबून आहे.
 आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा नेमका उद्देश कोणता आहे याची सुुक्षम जाणीव व्यवस्थापकाला असेल तर तो या अधिकारात कुणाला, किती प्रमाणात आणि कसं वाटेकरी करून घ्यावयाचे याचा आडाखा अचूकपणाने बांधू शकतो. अन्यथा बच्याचदा असंही होतं की, अधिकारांचं विकेंद्रीकरण करता करता ते करणार्याच्या हातात काहीच उरत नाही. त्यामुळे तो केवळ नावालाच वरिष्ठ राहतो. म्हणूनच व्यवस्थापकाला हा समतोल व्यवस्थित साधता आला पाहिजे. ही बाब वाटते तितकी सोपी नाही. हे कौशल्य विकसित करण्यासाठी व्यवस्थापकाला बरेच परिश्रम घ्यावे लागतात.
 अधिकार मिळालेल्या व्यक्तीची आणखी एक समस्या म्हणजे आपल्या तसंच अन्य विभागांतील घडामोडींची माहिती मिळवणं ही असते. ही माहिती बहुतेक वेळा कनिष्ठ कर्मचार्याकडूनच मिळत असते. वरिष्ठाला आवडेल अशीच माहिती देण्यात कनिष्ठाचा कल असतो. यामुळे खरी माहिती मिळणे अनेकदा शक्य होत नाही. हुकूमशाही प्रवृत्तीच्या व्यवस्थापकांची याबाबतीत दिशाभूल होण्याची शक्यता जाई असते.
खुशमस्करी:
 जितकी सत्ता अवतीभोवती खुशमस्कर्यांची वर्दळही अधिक. अशांना 'चमचा' हे लोकप्रिय नाव आहे. प्रत्येकाच्या मनात चमच्यांबद्दल राग असतो. पण चमचेगिरी निपटून काढण्याचे फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.कारण उभयपक्षी गरज असते.
 गुळाभोवती माशा घोंघाव्यात तसे चमचे सत्ताधीशांभोवती रूजी घालत असतात. ते सत्ताधीशाचा अहंकार सुखावत असल्याने त्यांच्यावर कितीही टीका झाली तर ते दूर केले जात नाही. कारण सत्तास्थान जितकं वरचं तितका सत्ताधीश एकाकी असतो. व ते स्थान मिळविण्यासाठी स्पर्धाही तीव्र असते. या स्थितीत स्वत:चं मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी चमचे ही त्याची मानसिक गरज असते. चमचेगिरीमुळेही काही अवांंतर फायदे होत असल्याने माणसं ती करण्यासाठी उद्युक्त होतात.
 चमच्यांना एक व्यवहारी फायदाही असतो. ते अवतीभोवतीची बितंबातमी वरिष्ठांपर्यंत पोहचवितात. त्याला वेळीच सावधही करतात.जी माहिती अधिकृत मार्गाने मिळणार नाही, ती चमच्यांमार्फत सहजपणे हाती येते. कारण त्याच्या हातात आहे. तोपर्यंत आपली सही टिकून राहील याची चमच्यांना जाणीव असते. अधिकार्याला धोरण ठरविताना या माहितीचा उपयोग होतो.
 चमच्यांच्या आहारी न जाता त्यांच्याकडून मिळणाच्या माहितीचा उपयोग करून घेण्याचा चाणाक्षपणा व्यवस्थापकानं दाखविला पाहिजे. तसं केल्यास चमचेगीरीसारख्या एरवी टीकेचा विषय असणाच्या बाबीचाही सकारात्मक उपयोग करून घेेता येतो.
संस्थेतील गटबाजी :
 अमुक संस्था गटबाजीने पोखरली आहे असं अनेकदा आपल्या कानावर येत असतं. प्रत्येक संस्थेत अतिमहत्त्वाची व सत्तालोलुप अशी मंडळी असतात ती एकत्र येऊन स्वतःच्या समान स्वार्थासाठी एक दबाव गट तयार करतात. संस्थेतील उच्चपदस्थांमध्ये स्वतःचंच वर्चस्व टिकविणं आणि वाढविणे यासाठी उघड किंवा छुपी स्पर्धा सुरू असते.असे उच्चपदस्थ या गटांना हाताशी धरतात. मग विरुध्द गटाचे पाय ओढण्यासाठी राजकारण सुरू होतं. कालांतराने विविध गटांमधील ही स्पर्धा संस्थेच्या हितांचा बळी देऊन चालविली जाते. या प्रक्रियेला गटबाजी असं म्हणतात.अधिकाधिक अधिकार आपल्या हातात आले पाहिजेत ही एकच भावना गटबाजीची प्रेरणा असते. सत्ताधीशाच्या गटात शिरकाव झाला की, आपल्यालाही सत्तास्थान मिळू शकेल या आशेपोटी गटबाजी वाढते. राजकारण हे त्याचं इवलंसं उदाहरण आहे.
 चमचेगिरी जशी पूर्णपणं नाहीशी करता येत नाही, तेच गटबाजीबाबतही सत्य आहे. मात्र, चमचेगिरीलाही एक सकारात्मक बाजू असते. तशी गटबाजीलाही आहे. एकमेकांना पाण्यात पाहणाच्या गटांचं जर संस्थेला प्रगतिपथावर नेणाच्या संघांमध्ये म्हणजेच टीम्समध्ये रूपांतर करता आले तर गटबाजीचाही फायदा संस्थेला होऊ शकतो. एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा स्वतःच्या विभागांची उन्नती साध्य केली तर सत्तास्थानंही मिळतील आणि संस्थेचंही कल्याण होईल, ही भावना गटबाजी करणाच्यांमध्ये रुजवली तर गटांच टीममध्ये रूपांतर करता येणे शक्य असतं. मनुष्यबळ व्यवस्थापकाने हे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे.
 अमेरिकेत सध्या व्यवस्थापनाचा एक अभिनव प्रकार रूढ होत आहे. त्याला ‘मॅनेजमेंट बाय वाँडरिंग अराऊंड’ असं म्हणतात. त्या अंतर्गत उच्चपदस्थ अधिकारी किंवा व्यवस्थापक आपला काही वेळ संस्थेस कोणत्याही पूर्वनियोजित कार्यक्रमाशिवाय फेटफटका मारण्यासाठी देतात. त्यामुळे त्यांना नेहमी न भेटणाच्या अनेक लोकांशी बोलण्याची, त्यांना समजून घेण्याची संधी मिळते. शिवाय यामुळं चमचेगिरी आणि गटबाजीलाही काही प्रमाणात आळा बसतो. भारतीय व्यवस्थापकांनीही हा मार्ग अवलंबिला पाहिजे.
सारांंश:  मनुष्बळ व्यवस्थापनाची कला कोणतेही व्यवस्थापकीय कामकाज करताना उपयोगी पडणारी कला आहे. यंत्र आणि साधनं यांचा उपयोगही अंतिमतः मानवाच्याच हातून होत असल्याने ही कला व्यवस्थापन क्षेत्रात सर्वश्रेष्ठ आहे. इतर कोणत्याही कलेप्रमाणं ही देखील उपजत असावी लागते हे खरं असलं तरी प्रयत्नानं ती विकसित करता येते.