अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/आव्हान ‘बदलांचे

विकिस्रोत कडून
ळे तुला सांगते, तुझा जन्म जरी या घरातला असला नं, तरी हे घर तुझं नाही बरं! तुझ्या लग्नानंतर तू ज्या घरात जाशील ते तुझं खरं घर! पण तिथं इथल्यासारख हुंदडायला आणि वाटेल तेव्हा खायला प्यायला नाही मिळणार. सासरी तुला जबाबदारीन वागावं लागेल.तिथली सगळी माणसं तुला नवी असतील. त्यांच्याशी तुला हसतमुखानं जमवून घ्याव लागेल. नव्या घरचे रीतीरिवाज समजून घेऊन त्याप्रमाणं वागावं लागेल. सासुबाई,मामंजी, दीर,नणंद आणि हो तुझ्या 'ह्यां'ची मर्जी सांभाळावी लागेल. लग्नानंतर तुझ्या जीवनात बरेच बदल घडणार आहेत.’

 आणि बरं का, सासूबाई किंवा कुणी बोललं तरी भांडायचं नाही हं त्यांच्याबरोबर. एखादे वेळेस तुझ्याकडून चहात जास्त साखर पडली तर, सासूबाई म्हणतील तुझ्या बाबांनी साखरेची पोती नाही दिली हुंडा म्हणून! आणि कमी साखर घातलीस तर त्या म्हणतील,इतका नको चिक्कूपणा करायला, आमच्या घरात भरपूर साखर असते. अशा वेळी काय करायच माहिती आहे? मौनं सर्वार्थ साधनम् अगदी गप्प बसायचं.
 काही दिवसांनी तूर त्या घरात रुळशील.मग तुझा एखादा दीर किंवा नणंद अशा प्रसंगी तुझ्या बाजूने उभे राहतील.ती तुझ्या यशाची पहिली पायरी असेल आणि एक दिवस असा येईल की सासूबाई अखेरच्या घटका मोजत असताना आपल्या मुलीला नव्हे तर तुला जवळ बोलावतील आणि घराण्याचे दागिने तुझ्या स्वाधीन करतील.त्या दिवशी तू तुझ्या घराची मालकीण होशील.
 हा संवाद आहे माझ्याच घरातला. माझा जन्म एकत्र कुटुंबात झाला. त्याकाळी घरातल्या लग्नाच्या वयाच्या मुलींना पोक्त स्त्रिया असा उपदेश करीत.लग्नानंतर त्यांच्या जीवनात होणाच्या अचानक बदलाला' सामोरे जाण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी करीत.
नित्य बदल:
 आपल्या जीवनामध्ये कधीही न बदलणारी बाब कुठली असेल,तर ती म्हणजे बदल. जन्माला आल्यापासून प्रत्येक जण क्षणाक्षणाला नकळत बदलत असतो. आपल्याभोवतीचे जग बदलत असते.संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे,...‘अगा हे नित्यनूतन देखिजे गीतातत्त्व||’ हे गीतातत्त्व म्हणजे विश्व, नित्यनूतन म्हणजे सतत नवे-अर्थात बदलणारे असते. बालपण, तारुण्य, वृध्दापकाळ या दशा सतत होणाऱ्या बदलांमुळे प्राप्त होत असतात. आपल्यात होणाऱ्या या नैसर्गिक बदलांबरोबर जमवून घेणे नैसर्गिकरीत्याच अंगवळणी पडत.अशा सातत्याने घडणाच्या बदलाला "नित्य बदल असं म्हणतात.

अनित्य बदल
 काही बदल हे ध्यानीमनी नसताना अचानक घडतात.‘हे असं काही घडले असं स्वप्नांतही वाटलं नव्हतं. हे वाक्य आपण अनेकदा उच्चरतो व ऐकतो. हे बदल काही वेळ सकारात्मळ असतात. जसं एखाद्या गरिबाला मोठ्या रकमेची लॉटरी लागणं, तर काही वेळ नकारात्मक असतात. उदाहरणार्थ,कामगारांच्या संपामुळे होणारं उद्योगाचं नुक़सान.
 काही वेळा हे एकदम होणारे बदल सकारात्मक आहेत की,नकारात्मक हे समजण्यास काही काळ जावा लागतो. मी लेखाच्या सुरुवातीला दिलेलं लग्नाच्या मुलीचं उदाहरण पहा. लग्न होऊन मुलगी परक्या घरी जाणं हा मुलीच्या व ती ज्यांच्या घरात जाते त्यांच्या जीवनात अचानक झालेला बदल असतो. पण तो सकारात्मक की नकारात्मक हे त्या विवाहाच्या यशावर किवा अपयशावर अवलंबून असतो. अशा बदलांना अनित्य बदल म्हणतात.

बदलांचे व्यवस्थापन
 उद्योग,राजकारण,अर्थव्यवस्था,प्रशासन आदी क्षेत्रेही या बदलांपासून अलिप्त नसतात. या क्षेत्रात घडणारे अनित्य बदल व्यक्तिगत आयुष्यातील बदलांपेक्षा जास्त गुंतागुंतीचे व कित्येकदा निर्माण करणारे असतात. समाजाची प्रदीर्घ काळ बसलेली घडी या बदलांमुळे विस्कटते. कित्येकांची जीवनशैली बदलते. कित्येकदा 'नको तो बदल,पूवींचंच बरं होतं’ असं वाटू लागतं. बदलाला विरोध करण्याची वृती बळावते. तरीही ते टाळता येत नाहीत.
 अशा परिस्थितीत बदलांचे तोटे कमीत कमी राखून जास्तीत जास्त फायदा करून घेणे व हे करताना बदलाला विरोध करणाऱ्यांनीही विश्वासात घेणं यालाच ‘बदलांचे व्यवस्थापन म्हणतात.
 काही वेळा या बदलांशी आपण जमवून घेणं,काही वेळा बदलांना आपल्याशी जमवून घ्यायला लावणं, काही वेळा आपण स्वतःच बदल घडवून आणणं आणि अशा तच्हेने आपण काम करत असलेल्या क्षेत्रांसाठी त्याचा फायदा करून घेणं हे आव्हान त्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यवस्थापकाला स्वीकारावं लागतं. हा व्यवस्थापनातील सर्वात नाजूक व निर्णायक टप्पा असतो. तो अत्यंत कौशल्याने हाताळावा लागतो.
 'बदलांची रेल्वेगाडी’ इच्छितस्थळी पोहोचण्यापूर्वी तिला तीन स्टेशनं घ्यावी लागतात. पहिलं, बदलांबाबतचं ज्ञान. दुसरं बदलांबाबतचा विश्वास. तिसरं बदल अंगी बाणणं. या गाडीचा वेग कितीही जास्त असला तरी ही तीन स्टेशनं घ्यावी लागतातच.
 होणारा बदल नेमका काय आहे, याचे ज्ञान प्रथम व्यवस्थापकाला असणं आवश्यक आहे. ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नसली किंवा असली तरी अर्धवट एकतर्फीं असते, तिला विरोध करण्याची आपली वृत्ती असते. शिवाय कोणताही बदल शंभर टक्के आदर्श किंवा पूर्णपणे फायद्याचा असत नाही. तो आपल्याबरोबर काही दोष तर काही गुण घेऊन येतो. त्यामुळे त्यांचे व्यवस्थापन असतं.
 अलीकडे डंकेल प्रस्ताव, गॅट करार हे शब्द ज्याच्या त्याच्या तोंडी आहेत. त्यांच्या विरोधकांना तुम्ही गॅट म्हणजे काय असे विचाराल तर ते सांगतील, ‘ते आम्हाला माहिती आमचा त्याला कट्टर विरोध आहे. गॅट, डंकेल यामुळे भारतातील नाही, पण उद्योगांमध्ये बरेच बदल होणार आहेत, हे त्यांना माहीत असते. मात्र, या करारांमधील तरतुदी कोणत्या आहेत व त्यांचा फायदा कसा उठवता येईल, याची जाणीव नसल्याने त्यांना विरोध केला जातो.
 याउलट या प्रस्तावांचे समर्थक त्यातील फायद्यांबाबत आपापसांत चर्चा करतात पण सर्वसामान्य जनतेला समजावून सांगत नाहीत. त्यामुळे लोकही अंधारात राहतात. तेव्हा बदल, स्वत: समजून घेणं व त्या बदलांचा ज्यांच्यावर परिणाम होणार आहे, त्या सर्वांना पटेल अशा पध्दतीने व पटेपर्यंत समजावून देणे, हे कुशल व्यवस्थापकाचं पहिलं काम आहे. मी सुरुवातीला दिलेला माझ्या घरातील संवाद हा 'बदल' समजून देण्याचाच उपक्रम आहे.
 त्यानंतरचा टप्पा म्हणजे बदल अंगी बाणणं. बदल केवळ कागदावर किंवा मनात असून उपयोग होणार नाही. तो कृतीत आणला पाहिजे. त्यानुरूप स्वतःची मानसिकता बदलली पाहिजे.

बदल हाताळण्याचे आव्हान :
 बदल घडवून इच्छिणाऱ्यांनी, ज्यांच्यासाठी हे बदल केले जात आहेत व ज्यांच्यावर या बदलांचा सर्वाधिक परिणाम होणार आहे, त्यांच्याशी सुसंवाद साधणे हे पहिली गरज आहे. कोणताही बदल मग तो कितीही आवश्यक व चांगला असला तरी प्रारंभीच्या काळात अडचणीचा वाटतो. असुरक्षिततेची भावना निर्माण होते. उदाहरणार्थ, गेल्या पन्नास वर्षात भारतात ७५ टक्क्यांहून अधिक नोकऱ्या सरकारी व सार्वजनिक क्षेत्रात निर्माण करण्यात आल्या. सार्वजनिक उद्योग, सरकारी उपक्रम (बँका, एलआयसी, इत्यादी) कधीही बंद न पडणारे अशी भावना बनल्यामुळे तेथील नोकरी सुरक्षित मानली जाऊ लागली. एकदा का अशी नोकरी मिळाली की, जन्माची ददात मिटली असा विश्वास निर्माण झाला. मात्र अनेक सरकारी उपक्रम ‘पांढरे हत्ती असल्याचे कालांतराने उघड होऊ लागलं. ते सांभाळणं सरकारला डोईजड झालं. मग गेल्या पंधरा वर्षापासून खासगीकरणाचे धोरण स्वीकारण्यात आलं हा अर्थव्यवस्थेत झालेला मोठा बदल होता. त्या पाठोपाठ आर्थिक उदारीकरण, निबंधमुक्त अर्थव्यवस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या, आंडवलशाही, बाजारी अर्थव्यवस्था इत्यादी शब्दांचा बोलबाला झाला. मात्र या सर्वांचा सर्वात जास्त परिणाम ज्यांच्यावर होत आहे ते सर्वसामान्य लोक या व्यापक बदलांबाबत अजूनही अज्ञानातच वावरत आहेत. त्यामुळे हे बदल त्यांना भावत नाहीत.
 आमच्या नोकऱ्या जातील, बेकारी वाढेल. आमच्या मुलाबाळांचे काय; असे प्रश्न त्यांना पडतात.बदलांना विरोध वाढतो. म्हणूनच लोकांना बदलांची नेमकी व सत्य माहिती दिली पाहिजे. बदल का करावे लागत आहेत याची कारणे त्यांना समजावून सांगितली पाहिजेत. सुरुवातीला काही समस्या निर्माण झाल्या,तरी दीर्घकालीन विचार करता हे बदल लाभदायक आहेत, हे पटल्यानंतर ते स्वीकारण्याची मानसिकता तयार होईल.
लोकभावनांशी सांगड
 बदलांची लोकांच्या भावनांशी व प्रचलित सवयींशी युक्तीने सांगड घातली गेली तर ते आवडीने व लवकर स्वीकारले जातात. सर्व बदल कायदे करून सक्तीने गळी उतरवता येत नाहीत. रोज आमटीभाकरी खाणायाच हे अन्न कायद्याने बंद केलं आणि त्यांच्यावर श्रीखंडपुरी खाण्याची सक्ती केली तरी तो ती मनापासून स्वीकारणार नाही. उलट ज्या क्षणाला कायदा मोडण्याची संधी मिळेल तेव्हा तो श्रीखंडपुरी फेकून देईल आणि आमटीभाकरीवर तुटून पडेल. कम्युनिस्ट रशियात नेमकं हेच झालं आहे.
 काही वेळा अनिष्ट परंपरा मोडीत काढण्यासाठी बदलांची सक्तीही करावी लागेल. उदाहरणार्थ उद्योग वा कोणत्याही क्षेत्रातला भ्रष्टाचार, पैशाचा अपव्यय, क्रूर सामाजिक परंपरा केवळ अंगवळणी पडल्या आहेत. म्हणून त्या चालू देणे योग्य ठरत नाही. अशा वेळी कठोर धोरण स्वीकारावं लागतं म्हणजेच, बदलांचे व्यवस्थापन करताना पस्थितीप्रमाणे साधकबाधक निर्णय घ्यावा लागतो. आर्थिक व उद्योग क्षेत्रालाही हाच नियम लागू आहे.
दोन्ही पक्षांची जबाबदारी
 भारतात आर्थिक क्षेत्रात बदलांचे वारे वाहू लागल्यापासून बदल समर्थक व बदल विरोधक असे दोन तट पडले आहेत. बदल ताबडतोब हवा असे समर्थकांचे तर बदल नकोच असे विरोधकांचे म्हणणे आहेया दोन गटांच्या ‘वैचारिक भांडणात' सर्वसामान्यांची अवस्था पंचतंत्रातील दोन गेंड्यांच्या टकरीत सापडलेल्या कोल्ह्यासारखी झाली आहे. यामुळे बदलांची प्रक्रिया लांबणीवर पडून सर्वांचेच अपरिमित नुकसान होत आहे.
 अशा परिस्थितीत या दोन्ही गटांमध्ये देशहिताच्या दृष्टीने व्यापक समझोता होण्याची नितांत आवश्यकता आहे. बदल समर्थकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, सर्वसामांन्य जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय बदल यशस्वी होणार नाहीत. तर बदल हे होणारच आहेत. ते टाळता येणार नाहीत. बदलांमुळे काही प्रमाणात त्रास होईल, मात्र बदल टोळल्यामुळे त्यापेक्षा जास्त संकटांना तोंड द्यावे लागेल, हे विरोधकांनी ध्यानात घेणे जरूरीचं आहे. हे तत्व केवळ उद्योग क्षेत्रालाच नाही तर सर्वच सामाजिक क्षेत्रांना लागू आहेया दोन्ही गटांच्या सहकार्यावरच आपल्या अर्थव्यवस्थेचं आणि पर्यायाने देशाचं भवितव्य अवलंबून आहे आणि या परस्परविरोधी गटांना एकत्र आणण्याच्या कामात त्या संबंधित क्षेत्रातील ‘व्यवस्थापकांचं’ कौशल्य पणाला लागणार आहे.याबाबत आपण चीनचां आदर्श डोळ्यांसमोर ठेवावयास हरकत नाही. चीनमधील कामगार संघटना आणि सरकार यांच्यातल्या एकोप्यामुळेच तेथे उदारीकरण व खासगीकरणांच्या माध्यमातून आर्थिक क्रांती घडून आली.
 शेवटी मी पुन्हा लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या माझ्या धरातील संवादाकडे वळतो. तो बदलांचे समर्थक व विरोधक या दोहोंसाठी उद्बोधक आहे. माझ्या घरातील ती अनुभवी स्त्री लग्नाच्या वयाच्या मुलीला जे सांगत आहे, त्यात ‘बध बाई, लग्न हा असा प्रकार असतो. तुला जमेल का ते सर्व? नसेल तर तू आपली लग्नच करू नको. आहेस तशीं सुखी राहा.’ असा उपदेश तिने चुकूनसुध्दा केलेला नाही. उलट ‘या आव्हानाचा तू स्वीकार कर. तो तू मी सांगते त्या पध्दतीने केलास तर अंतिम विजय तुझाच आहे,’ हा आत्मविश्वास त्या मुलीच्या मनात निर्माण केला जातो आहेम्हणजेच तिच्या जीवनात घडू घातलेल्या बदलाचं कसं खुबीदारपणे ‘व्यवस्थापन’ सुरू आहे, ते आपल्या लक्षात येईल.
 अशाचं सामोपचाराची उद्योग, अर्थ, शिक्षण, राजनीती, संरक्षण, शेती इत्यादी सर्वच क्षेत्रांत गरज आहे.या क्षेत्रात झपाट्याने घडणारे व न टाळता येणारे बदल समर्थक व विरोधक यांच्यातील सामंजस्यानेच फायदेशीररीत्या स्वीकारले जाऊ शकतील आणि हे सहकार्य घडवून आणणे हे त्या त्या क्षेत्रातील व्यवस्थापकांसमोरील आव्हान असेल.